नगरसेविका नामधारी; पतिराजच कारभारी !

By Admin | Updated: March 12, 2017 00:25 IST2017-03-12T00:25:42+5:302017-03-12T00:25:42+5:30

मावळत्या सभागृहाच्या तुलनेत यंदा महिला नगरसेविकांची संख्या २ ने वाढली असताना येत्या पाच वर्षात तरी ‘नगरसेविका नामधारी, पतिराजच कारभारी’ हे चित्र पालटेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Corporator named; Patiraj is steward! | नगरसेविका नामधारी; पतिराजच कारभारी !

नगरसेविका नामधारी; पतिराजच कारभारी !

चित्र पालटेल का ? : महापालिकेत ४७ महिला सदस्य
अमरावती : मावळत्या सभागृहाच्या तुलनेत यंदा महिला नगरसेविकांची संख्या २ ने वाढली असताना येत्या पाच वर्षात तरी ‘नगरसेविका नामधारी, पतिराजच कारभारी’ हे चित्र पालटेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत महापालिकेतील बहुतांशी नगरसेविकांच्या प्रभागांमधील विकासकामांपासून जनसंपर्कापर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांचे पतिराजच सांभाळत असल्याचे दिसून आले होते. २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये किमान हे चित्र पालटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभागातील कामे किंवा नव्या प्रभाग रचनेबाबत नगरसेविकांकडे विचारणा केली तरी त्यांच्याशी बोलता का, असा प्रश्नवजा सल्ला ‘त्या’ देत असल्याचे नगरसेविकांशी संपर्क साधल्यानंतर जाणवले होते. परिणामी बहुतेक नगरसेविका या नावापुरत्याच असल्याचेही स्पष्ट झाले होते.
काहींचे काम प्रभावी
महापालिकेतील अनेक नगरसेविकांची कामे त्यांचे पती करीत असले तरी काही नगरसेविकांनी प्रभागात प्रभावी कामे केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या योजना राबविण्यात महिलांचा पुढाकार दिसून आला. रखडलेल्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आताच्या सभागृहातील ४७ महिला नेमका कुठला कित्ता गिरवतात, याकडे लक्ष लागले आहे.

काहींनी गाजविले होते सभागृह
अमरावती : महापालिकेतील काही नगरसेविकांना अक्षरश: सभागृह गाजविले. मात्र ती संख्या बोटावर मोजण्याइतपत होती, हा भाग अलहिदा.
महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात यंदा ४७ महिला नगरसेविका पोहोचल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत ही संख्या ७ ने अधिक आहे. यातील सर्वाधिक नगरसेविका भाजपच्या असल्या तरी शिवसेना, बसपा, एमआयएम आणि काँग्रेसकडूनही अनेक नगरसेविका पहिल्यांदा सभागृहात पोहोचल्यात. कुसुम साहू, उपमहापौर संध्या टिले, सुनंदा खरड या अनुभवी नगरसेविकासुद्धा सभागृहात आहेत. मात्र अनेक जणी आरक्षण बिघडल्याने ऐनवेळी उमेदवार झाल्या व जिंकूनही आल्या हे चित्र सुखद आहे. बहुतांश नगरसेविकांचे पती विविध संबंधित पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रभागातील समस्या सभागृहात मांडाव्यात, चर्चेत सहभाग घ्यावा, अशी मतदारांची इच्छा आहे. अन्यथा मागील पंचवार्षिकमध्ये काही नगरसेविकांचे पतीच हातात फाईल घेऊन अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवित आहेत.

काहींचे काम प्रभावी
महापालिकेतील अनेक नगरसेविकांची कामे त्यांचे पती करीत असले तरी काही नगरसेविकांनी प्रभागात प्रभावी कामे केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या योजना राबविण्यात महिलांचा पुढाकार दिसून आला. रखडलेल्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आताच्या सभागृहातील ४७ महिला नेमका कुठला कित्ता गिरवतात, याकडे लक्ष लागले आहे.

‘पतिराज’च देतात अधिकाऱ्यांना निर्देश
सकाळच्या स्वच्छतेच्या पाहणीसह अन्य कामातही हे पतीराज घुसखोरी करतात. विकासकामांच्या फाईल्स नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे पतीराज हाताळतात. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही ‘त्या’ फारशा बोलत नसल्याचे वारंवार दिसून आले. प्रभागातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पतिराजांच्या सल्ल्यानुसारच सभागृहात ‘त्या’ भूमिका मांडत असल्याचे सांगण्यात येते.

वादाचे प्रसंग
नगरसेविकांऐवजी त्यांचे पतिराज किंवा कुटुंबातील अन्य एखादा सदस्य फाईल घेऊन अधिकाऱ्यांकडे जातात. स्वच्छता व अन्य कामांबाबत निर्देशही देतात. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये असे पतीराज व अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग ताजे आहेत. अतिरिक्त शहर अभियंत्यासह अनेक अधिकाऱ्यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.

Web Title: Corporator named; Patiraj is steward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.