नगरसेवक-मुख्याधिकाऱ्यांचा वाद न्यायालयात जाणार

By Admin | Updated: August 1, 2015 01:49 IST2015-08-01T01:49:13+5:302015-08-01T01:49:13+5:30

चांदूररेल्वे नगरपरिषदेची विशेष साधारण सभा २२ जुलैला पार पडली. सभेपूर्वी नगरसेवक बंडू आठवले

Corporator-Chiefs will go to court in court | नगरसेवक-मुख्याधिकाऱ्यांचा वाद न्यायालयात जाणार

नगरसेवक-मुख्याधिकाऱ्यांचा वाद न्यायालयात जाणार


चांदूररेल्वे : चांदूररेल्वे नगरपरिषदेची विशेष साधारण सभा २२ जुलैला पार पडली. सभेपूर्वी नगरसेवक बंडू आठवले व इतर नगरसेवकासह मुख्याधिकारी मंगेश खवले यांच्या कक्षात आपल्या प्रभागातील मागण्यांचे लेखी निवेदनासह निर्णय आताच झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतल्याने जोरजोराने शाब्दिक चकमक उडाली त्यामुळे काही काळ मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मी तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, असे जोरजोराने आरडाओरड करीत होते. त्यानंतर बंडू आठवले आवेशात आल्याने त्यांची प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांना चांदूररेल्वे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले व त्यानंतर अमरावतीच्या खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मुख्याधिकारी मंगेश खवले आणि लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात नगरसेवक बंडू आठवले यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने बंडू आठवले यांनी २५ जुलै रोजी मुख्याधिकारी मंगेश खवले यांच्याविरूद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दखल केली. यावर चांदूररेल्वेचे प्रभारी ठाणेदार रीता उईके यांनी लेखी तक्रारीची चौकशी सुरू केली. यानंतर सर्व तपास सहायक उपनिरीक्षक अंभोरे यांच्याकडे देण्यात आला. पोलिसांनी बंडू आठवले यांच्याविरुद्ध ३५३, ३४८, ४२७, २९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला. बंडू आठवले यांनी २५ जुलैच्या तक्रारीवरुन मंगेश खवले यांचेविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अधिनियम प्रतिबंधक अ‍ॅट्रॉसीटी ३(१) (१०) अन्वये गुन्हा दाखल केला. अंभोरे यांचेकडे चौकशी दरम्यान कोणकोणत्या व्यक्तीच्या जबानी घेण्यात आली, ती माहिती देण्यास नकार दिला. अ‍ॅट्रॉसिटीची चौकशी महसूल विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी नितीन व्यवहारे चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.
चांदूररेल्वे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २२ जुलै रोजी होती. त्यात विरोधक एलअ‍ेडी लाईटच्या निविदाचा मुद्दा चर्चिल्या जाणार होता, अशीही चर्चा नगरपरिषद वर्तुळात सुरू आहे.
चांदूररेल्वे नगरपरिषदेत भाजपाच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राकाँचे उपाध्यक्ष आहेत. बंडू आठवले हेसुद्धा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असल्याने शाब्दिक तंटे घडण्यामागे कोणते कारण आहे, याची चर्चा शहरात सुरू आहे. आता न्यायप्रविष्ट झाल्यावर कार्यवाही होणार याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Corporator-Chiefs will go to court in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.