नगरसेवक भारत चौधरीच्या वरली-मटका अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:32 IST2018-04-13T22:31:11+5:302018-04-13T22:32:35+5:30
शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलिसांनी नगरसेवक भारत चौधरी यांच्या यशोदानगरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून सात जणांंना अटक केली.

नगरसेवक भारत चौधरीच्या वरली-मटका अड्ड्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलिसांनी नगरसेवक भारत चौधरी यांच्या यशोदानगरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून सात जणांंना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात आणि उपायुक्त पंडित यांच्या नेतृत्वात फे्रजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या पथकाने शुक्रवारी यशोदानगर गल्ली नं. १ मधील वरली-मटका व्यवसायावर धाड टाकली. शिवसेनेचे नगरसेवक भारत छेदीलाल चौधरी व बबलू वासुदेव खडसे हे वरली-मटका व्यवसायाचे मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. भारत चौधरी, बबलू खडसे (५२, रा. यशोदानगर), सुरेश तुकाराम बोरकर (३८, रा. प्रबुद्धनगर), मनोज रामकृष्ण कांबळे (४४, रा. ज्योती कॉलनी), संजय जाधव (३५), मनोज रामरतन यादव (३८, रा. धन्वंतरीनगर) व प्रदीप कुंदनलाल जयस्वाल (५४, रा. ज्योती कॉलनी) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १७ हजारांची रोख, वरली-मटक्याचे साहित्य, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.