शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात सेमाडोह नजीक महामंडळाची बस दरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू, २५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:50 IST

अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७  सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा  घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला.

नरेंद्र जावरे -

परतवाडा  : अमरावती वरून मध्यप्रदेशच्या तुकईथड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी ११:३० वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्याने ३० फूट खोल दरीत कोसळली. त्यात दोन महिला ठार तर २५ पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.इंदू समाधान गंत्रे (६५) रा साठमोरी ता खकणार मध्यप्रदेश, ललिता चिमोटे (३०) बुरडघाट, अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह अजूनही एसटीमध्येच आहेत. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर, लाला कासदेकर बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले आहेत. परिवहन महामंडळाचे अधिकारीसुद्धा निघाल्याची माहिती परतवाडा आगाराची व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी दिली. अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७  सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा  घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकDeathमृत्यूAmravatiअमरावती