शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना उपचारासाठी घेतली मांत्रिकाकडे धाव; महिलेचा मृत्यू, मेळघाटात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:44 IST

CoronaVirus News : मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी मांत्रिकाकडे (भूमका) उपचारासाठी जातात.

- नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील मांत्रिकाकडे गेली; मात्र गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र नातेवाइकांनी त्यास नकार दिला. अखेर शुक्रवारी २० तासांनंतर नातेवाइकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे.

मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी मांत्रिकाकडे (भूमका) उपचारासाठी जातात. यात लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी पद्धत अवलंबविली जात असल्याचे ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले आहे.

सूत्रांनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षीय विधवा महिलेची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी १०.५० वाजता डॉक्टरांनी दिला. त्यानुसार सदर महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी आपणास काहीच झालेले नाही, असे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सुनावून तिने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाइकांच्या मदतीने कोरोनावर मांत्रिकाकडे उपचार सुरू केला; मात्र या दरम्यान आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला.

रात्रभर मृतदेह पडून- महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री ८ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश कूर्तकोटी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना पाचारण केले. - अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. सर्वांनी समजाविले तरी नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या हट्टामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह रात्रभर घरीच ठेवला. अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार झाले.

सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला. उपचारासाठी ती मांत्रिकाकडे गेली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी गुरुवारी रात्री विरोध दर्शविला.- माया माने, तहसीलदार, चिखलदरा.

टॅग्स :MelghatमेळघाटCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस