Coronavirus : मेळघाटातील कुपोषित बालक, गर्भवती मातांचा आहार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:31 PM2020-03-20T20:31:17+5:302020-03-20T20:31:43+5:30

Coronavirus :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील सहा महिने ते सहा वर्षांआतील ३३ हजार बालकांसह ४ हजार स्तनदा व १५०० गर्भवती मातांचा आहार पूर्णत: बंद आहे.

Coronavirus: feeding off pregnant mothers malnutrition in Melghat | Coronavirus : मेळघाटातील कुपोषित बालक, गर्भवती मातांचा आहार बंद

Coronavirus : मेळघाटातील कुपोषित बालक, गर्भवती मातांचा आहार बंद

Next

चिखलदरा (अमरावती) : कोरोना  व्हायरसची खबरदारी म्हणून  मेळघाटातील कुपोषित व सर्वसाधारण श्रेणीतील सर्वच बालकांसह गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणारा पूरक पोषण व अमृत आहार १६ मार्चपासून बंद आहे.

अंगणवाडी केंद्रांना टाळे लागल्याने नेहमीप्रमाणे आहारासाठी जाणारे आदिवासी बालक रित्या पावलांनी घरी परत येत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शहरी व ग्रामीण भागात बालकांना घरपोच आहार देण्याचे शासनाचे आदेश आहेत. 

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील सहा महिने ते सहा वर्षांआतील ३३ हजार बालकांसह ४ हजार स्तनदा व १५०० गर्भवती मातांचा आहार पूर्णत: बंद आहे. शासनाने शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रासाठी १८ मार्च रोजी परिपत्रक काढले. त्यामध्ये अंगणवाड्यांमध्ये लाभार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात सहा ते तीन वर्षे वयातील बालकांना ताजा व गरम आहार देण्याऐवजी घरपोच आहार देण्याचे आदेश दिल्याने त्या अंगणवाडी केंद्रांतील बालकांच्या घरी जाऊन आहार दिला जात आहे.

परंतु मेळघाटातील अंगणवाडी केंद्रांना १६ मार्चपासून टाळे लागले आहे. परिणामी गर्भवती स्तनदा व कुपोषित बालक आहारापासून वंचित आहेत.

Web Title: Coronavirus: feeding off pregnant mothers malnutrition in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.