शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Coronavirus in Amravati; मेळघाटात कहर; कोरकू भाषेतून लसीकरणाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:40 PM

Coronavirus in Amravati चिखलदरा तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.

ठळक मुद्देजनजागृती, लसीकरणावर भर, प्रशासन सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावी: चिखलदरा तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तालुक्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व चिखलदरा व चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण केंद्र उपलब्धतेनुसार सुरु करण्यात आले आहे.तालुक्यात विनामास्क, मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी व सोशल डिस्टंसिंग भंग केल्याप्रकरणी १४ लोकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणीसाठी सेमाडोह, बिहाली, चिखलदरा, डोमा येथे या चार नाक्यांवर आरोग्य विभागाची पथके नेमण्यात आली. डोमा येथे आतंर राज्य सीमेवर पोलीस बंदोबस्तात येणा?्या-जाणा?्या लोकांवर नजर ठेवून तपासण्या करण्यात येत आहेत. गावोगावी आरटीपीसीआर तपासणीचे कॅम्प लावण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी लोकमतशी बोलताना दिली.शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना टेस्टिंगटेंब्रुसोडा, चिखली, चिखलदरा व डोमा या ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. चिखलदरा व चुरणी या ठिकाणी कोविड समर्पित रुग्णालयांची स्थापना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आमदार निधी व इतर सामाजिक संस्थांचा हातभार लागला आहे.प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.कोरकू भाषेतून संवादतालुक्यातील दुर्गम भागात कोरकू भाषेत कोरोना संबंधी जनजागृती तसेच लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासींमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन आता गावागावांत जाऊन जनजागृती करीत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. रुग्णांसाठी हेल्पलाईन उघडण्यात आल्या आहेत. गृह विलगीकरण असलेल्या नागरिकांशी आरोग्यविषयक संवाद साधण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस