CoronaVirus in Amravati : अमरावतीत पुन्हा सहा जणांना कोरोनाचे संक्रमण : चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 22:10 IST2020-04-24T22:09:18+5:302020-04-24T22:10:22+5:30
अमरावती शहरात शुक्रवारी पुन्हा सहा कोरोना चाचणी नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमरावती शहरात कोरानाग्रस्तांची एकूण संख्या १४ झाली आहे.

CoronaVirus in Amravati : अमरावतीत पुन्हा सहा जणांना कोरोनाचे संक्रमण : चिंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती शहरात शुक्रवारी पुन्हा सहा कोरोना चाचणी नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमरावती शहरात कोरानाग्रस्तांची एकूण संख्या १४ झाली आहे. त्यातील चार जणांना शुक्रवारी कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच कोरोनोग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरानाग्रस्तांपैकी एका महिलेचा नमुने पाठविण्यापूर्वीच मृत्यू झाला. उर्वरित पाच कोरानाग्रस्तांमध्ये चार महिला आणि एक पुरुष आहेत. सदर कोरोनाग्रस्त कमेला ग्राऊंड, तारखेडा, पाटीपुरा आणि हैदरपुऱ्यातील आहेत. कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या परिसरात 'क्लस्टर झोन' घोषित करण्यात आले आहे. अमरावतीत टाळेबंदी आता कडक करण्यात आलेली आहे.