शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनानंतर आता 'सारी'चं थैमान; औरंगाबादपाठोपाठ अमरावतीत २२ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:07 IST

ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी या आजाराची लक्षणे आहेत

अमरावती : कोरोनासदृश लक्षणे असणाºया ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराचा शिरकाव शहरात झालेला आहे. या आजाराचे शहरात आतापर्यंत २२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी दिली.  महापालिकेत या आजारासंदर्भात मंगळवारी झालेल्या आरोग्य अधिकाºयांच्या बैठकीत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सारी व कोरोना रोगाची तपासणी व्हावी, यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली.  राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्यरुग्ण व आंतररुग्णांचे ‘सारी’ आजारासंदर्भात सर्वेक्षण करावे, असे निर्देश पुणे येथील राज्य आरोग्य सेवेच्या संचालक अर्चना पाटील यांनी यापूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.

ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी या आजाराची लक्षणे आहेत. अशा रुग्णांना १०८ अ‍ॅम्ब्यूलन्समधून कोविड -१९ साठी निश्चित केलेल्या १०० व त्यापेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. 

अमरावती जिल्ह्यात ‘सारी’ आजाराचे २२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कुणीही गंभीर नाही. या रुग्णांची नोंद नॉन कोविड सिग्नोमॅटिकमध्ये करण्यात आली आहे. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस