महिला दिनानिमित्त कोरोनायोद्ध्या महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:51+5:302021-03-09T04:15:51+5:30

अंजनगाव सुर्जी : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडीकडून महिला कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. त्याअनुषंगाने सोमवारी ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील ...

Coronation women felicitated on the occasion of Women's Day | महिला दिनानिमित्त कोरोनायोद्ध्या महिलांचा सत्कार

महिला दिनानिमित्त कोरोनायोद्ध्या महिलांचा सत्कार

अंजनगाव सुर्जी : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडीकडून महिला कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. त्याअनुषंगाने सोमवारी ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील गंभीर आजारी, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर महिलांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्चना पखान, सुनीता मुरकुटे, शहर सरचिटणीस ........... बेलसरे उपस्थित होत्या. यावेळी कोरोनायोद्ध्या म्हणून अरुणा भोयर, सुनीता पाटील, नीतू कासदेकर, प्रिया मोहोळे, सुवर्णा बरडे, अश्विनी घाटगे, विद्या कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

----------------------

दापोरी येथे महिलांचा सन्मान

मोर्शी : जागतिक महिला दिनानिमित्त दापोरी ग्रामपंचायततर्फे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, महिला सरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रूपेश वाळके, सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, सचिव राजकुमार कोंडे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश अंधारे, शालिनी अंधारे, वर्षा बिले, वर्षा पाटील, प्रवीणा नांदूरकर, अर्चना कोल्हेकर, श्रुती झळके, मंगला मिरासे, राजकन्या नवघरे, विलास वाळके, गोविंद अढाऊ उपस्थित होते.

-----------------

अंजनगाव पंचायत समितीत महिला दिन

वनोजा बाग : पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी किशोर पवार, तालुका आरोेग्य अधिकारी सुधीर डोंगरे व पंचायत समिती सदस्य नितीन पटेल यांनी आशा सेविकांचा प्रशस्तीपत्र व तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुजाता रायबोले यांनी यावेळी प्रतिक्रियादेखील व्यक्त केली.

-------------

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठात व्याख्यानमाला

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे मराठी भाषा गौरव दिन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यानिमित्त मराठी विभागाद्वारा आयोजित व्याख्यानमालेत कवयित्री व अनुवादक आसावरी काकडे, माधव पुटवाड, पृथ्वीराज तौर आणि माधवी वैद्य यांची व्याख्याने झाली. मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे ,माजी अधिष्ठाता डॉ. मनोज तायडे, विभागातील हेमंत खडके, प्रणव कोलते उपस्थित होते.

-------------------

पान ३ साठी

Web Title: Coronation women felicitated on the occasion of Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.