धानोरा गुरव येथे स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:18 IST2021-08-18T04:18:06+5:302021-08-18T04:18:06+5:30

धानोरा गुरव ग्रामस्थांचे पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले. या अनुषंगाने सत्कारमूर्ती म्हणून आरोग्य विभागाची संपूर्ण चमू, आरोग्य ...

Coronation Warriors felicitated on Independence Day at Dhanora Gurav | धानोरा गुरव येथे स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

धानोरा गुरव येथे स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

धानोरा गुरव ग्रामस्थांचे पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले. या अनुषंगाने सत्कारमूर्ती म्हणून आरोग्य विभागाची संपूर्ण चमू, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी अशा २६ जणांना कोरोनायोद्धा म्हणून शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर, जलसंधारण उपविभागीय अधिकारी प्रशांत आवंदकर, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट, आरोग्य अधिकारी डॉ. शुभागी दिघाडे, ग्रामसेवक ओमप्रकाश खंडारे, केंद्रप्रमुख विलास राठोड यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सरपंच अश्विनी शेंदरे, उपसरपंच प्रमोद कोहळे, सदस्य नितीन जाधव, कपिल साबळे, प्रतीक्षा चौधरकर, हेमा पांडे, शालू सवटे, तंटामुक्ती अध्यक्ष शरद गुंजाळ, दत्तात्रय डांगे, अवधूत साखरे, संजय पांडे, जानराव बगळते, नारायण सावंत, जसपालसिंग जाट, सुरेश राजगुरे, आसाराम इंगळे, केशव तायडे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन धानोरा गुरव ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक किशोर जाधव, अमोल बगळते, दिवाकर लेंडे, विनोद बगळते, बाबुजी ढाले, भास्कर साखरे, सूरजसिंग कदम, नरेंद्रसिंग जाधव, प्रवीण शेंदरे, योगेश गुंजाळ, नीलेश पेठे, रतनसिंग बाजहिरे, विजय निकोडे, गोवर्धन साबळे, गजानन चव्हाण, श्रीकृष्ण साठे, विकास राऊत, दिनेश लांडगे व ग्रा.पं.सदस्य, कर्मचारी, जि.प.शाळा मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल राजगुरे यांनी व आभार प्रदर्शन नितीन जाधव यांनी केले.

170821\1253-img-20210817-wa0005.jpg

धानोरा गुरव येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान.

Web Title: Coronation Warriors felicitated on Independence Day at Dhanora Gurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.