कोरोनाची पुन्हा तीव्रतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:21+5:302021-02-05T05:25:21+5:30

अमरावती : संपला, संपला करीत ज्याला धुडकावण्यात आले, त्या कोरोनाने शनिवारी १४९ असा अलीकडचा नवा उच्चांक गाठला. २६ जानेवारीला ...

Corona's way back to intensity | कोरोनाची पुन्हा तीव्रतेकडे वाटचाल

कोरोनाची पुन्हा तीव्रतेकडे वाटचाल

अमरावती : संपला, संपला करीत ज्याला धुडकावण्यात आले, त्या कोरोनाने शनिवारी १४९ असा अलीकडचा नवा उच्चांक गाठला. २६ जानेवारीला १११ कोरोनाग्रस्तांचा अहवाल आला होता. त्यानंतर हा आकडा बेफिकीर अमरावतीकरांना हादरविण्यास पुरेसा आहे. याशिवाय कोरोना संसर्गाने दिवसभरात दोघांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा कोविड रुग्णालयाने स्पष्ट केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर तसेच विविध प्रयोगशाळांनी शनिवारी कोरोना चाचणी अहवालात १२६४ चाचण्या घेतलेल्यांपैकी १४९ जणांना कोरोनाग्रस्त घोषित केले. त्यापूर्वी २६ जानेवारी रोजी १११ कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले होते. मार्च महिन्यातील कोरोना लॉकडाऊनपासून कोरोनामुळे ४१७ मृत्यू झाले आहेत. शनिवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये संसर्गाच्या सर्वाधिक कालावधीनंतर अलीकडील पंधरवड्यात कोरोनाग्रस्तांची दैनंदिन संख्या शंभराच्या आतच निघत होती. त्यामुळे दिलासादायक स्थिती असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याच्या परिणामी काही नियम कायम असले तरी बहुतांश बाजारपेठ, मंदिरे खुली झाली. शाळादेखील सुरू करण्यात आल्या. सर्व काही आलबेल असल्याचे दिसत असतानाच शनिवारी कोरोनाने हादरा दिला.

दरम्यान, दिवसभरात १४३ कोरोनामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २१ हजार ७५९ कोरोनाग्रस्त झाले आहेत, तर २१ हजार ८ कोरोनामुक्त झाले आहेत. ३३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील आतापर्यंत १ लाख ७८ हजार ३ नागरिकांची कोरोनासंबंधी तपासणी करण्यात आली आहे.

सोमवारपासून झालेल्या चाचण्यांतून कोरोनाग्रस्त

२५ जानेवारी ८७

२६ जानेवारी १११

२७ जानेवारी ३८

२८ जानेवारी ७८

२९ जानेवारी ९३

३० जानेवारी १४९

Web Title: Corona's way back to intensity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.