कोरोनाच्या थैमानाने राजुरा परिसर हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST2021-05-13T04:12:54+5:302021-05-13T04:12:54+5:30
जिल्हा परिषद सदस्याकडून आठ गावांत फवारणीचे द्रावण, ग्रामपंचायतीकडून ५० हजारांच्या औषधी राजुरा बाजार : कोरोनाच्या थैमानाने ग्रामीण भागातील नागरिक ...

कोरोनाच्या थैमानाने राजुरा परिसर हादरला
जिल्हा परिषद सदस्याकडून आठ गावांत फवारणीचे द्रावण, ग्रामपंचायतीकडून ५० हजारांच्या औषधी
राजुरा बाजार : कोरोनाच्या थैमानाने ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जरूड सर्कलचे सदस्य राजीव बहुरूपी यांनी स्वखर्चाने आठ गावांकरिता सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाचे निःशुल्क वाटप केले.
राजुराबाजार, गाडेगाव, काटी, वाडेगाव, वडाळा, वंडली, वघाळ, अमडापूर या गावात फवारणी केली जाणार आहे. याशिवाय राजुरा बाजार ग्रामपंचायतीच्यावतीने ५० हजारांच्या औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून रुग्णांना त्याचे करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश राऊत, डॉ. शुभा शेळके, सरपंच नीलेश धुर्वे, गाडेगावचे उपसरपंच सचिन सावरकर, माजी सरपंच किशोर गोमकाळे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर भोंडे, रजनी भोंडे, रवींद्र जोगेकर, राहुल श्रीराव, माजी उपसरपंच सुधाकर डाफे, सुनील काकडे, सतीश भड, सुरेश घाटोळे, विकास भोंडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.