कोरोनाचे सहा बळी, ४०६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:48+5:302021-03-18T04:13:48+5:30
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६१४ वर पोहोचली आहे. याशिवाय ४०६ अहवाल ...

कोरोनाचे सहा बळी, ४०६ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६१४ वर पोहोचली आहे. याशिवाय ४०६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४३,७५७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
कोरोना चाचण्यांची संख्यावाढ झाल्याने पॉझिटिव्हची संख्यावाढ झाली आहे. बुधवारी ३,७११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झालेली आहे. पाच दिवसांपासून पॉझिटिव्हिटीत सातत्याने कमी येत आहे. तसे पाहता फेब्रुवारी महिन्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ४० टक्क्यांवर नोंदविले गेले व रुग्णसंख्येचादेखील ९५० पर्यंत उच्चांक होता. आता हा आलेख आता माघारला आहे.
चाचण्या वाढल्या की, रुग्णसंख्येत वाढ येणार, मात्र, काही दिवसांनंतर संसर्गातदेखील कमी येते. त्यानुसार जिल्ह्यात स्थिती असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
उपचारादरम्यान बरे वाटल्याने बुधवारी ४४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यानंतर त्यांना किमान एक आठवडा गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. सद्यस्थितीत कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या ३८,८३६ झालेली आहे व एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ८८.७५ टक्के आहे. जिल्ह्यात सद्यस्थतीत ४,३०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात १,७७७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे, तर उर्वरित रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये उपचार घेत आहेत.
बॉक्स
२४ तासांत सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांझर, नांदगाव खंडेश्वर येथील ७० वर्षीय पुरुष, गाडगेनगर अमरावती येथील ६५ वर्षीय महिला, नया अकोला येथील ७५ वर्षीय पुरुष, कारंजा लाड, वाशिम ७० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे येथील ७० वर्षीय पुरुष व घाटलाडकी, चांदूर बाजार येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत कोरोनाग्रस्तांची संख्या ६१४ वर पोहोचली आहे.