शिक्षण विभागातही कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:13+5:302020-12-31T04:14:13+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत दोन लिपिकांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत चितेंचे ...

शिक्षण विभागातही कोरोनाचा शिरकाव
अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत दोन लिपिकांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत चितेंचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या विभागातील तीन ते चार जणांना कोरोनाची बाधा झाली होती.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करावी लागत आहे. यात शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनीदेखील कोरोना चाचणी करवून घेतली. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील दाेन कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका महिला कर्मचाऱ्यांच्या पतीचा काेरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यासुध्दा क्वारंटाईन झाल्या आहेत. शिक्षण विभागात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्येसुध्दा चितेंचे वातावरण पसरले आहे. शिक्षण विभागात सॅनिटायझर करण्यात आले असून खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड खान यांनी सांगितले.