कोरोनाचे चार मृत्यू, ३४४ अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:39+5:302021-04-08T04:13:39+5:30

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६९२ झालेली आहे. याशिवाय बुधवारी ३४४ ...

Corona's four deaths, 344 reports positive | कोरोनाचे चार मृत्यू, ३४४ अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाचे चार मृत्यू, ३४४ अहवाल पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६९२ झालेली आहे. याशिवाय बुधवारी ३४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५०,७२२ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

जिल्हाभरातील ३,४९९ नमुन्यांची बुधवारी तपासणी करण्यात आली. ३४४ नमुने पॉझिटिव्ह आढळले. यात ९.८३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविली गेली. सलग चार दिवस पॉझिटिव्हिटीचा आलेख उंचावत असताना बुधवारी मात्र, माघारला आहे. जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. या आदेशानुसार रात्रीची संचारबंदी व दिवसाला जमावबंदी आहे. याशिवाय जीवनावश्यक व्यतिरिक्त अन्य दुकाने व आस्थापना बंद आहेत. तरीही रस्त्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ व वाहनांची गर्दी दिसून येते. प्रशासनाद्वारा दंडनीय कारवाया करीत नसल्याने कसा रोखणार कोरोना, असा नागरिकांचा सवाल आहे.

दरम्यान ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या रोज कमी होत असल्याने रुग्णालयातील बेडची संख्यादेखील कमी होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४० कोरोना हॉस्पिटल आहेत. यात एकूण बेडची संख्या २,८०६ आहेत व यामधील ८२० बेडवर सध्या रुग्ण असल्याने १,९८६ बेड रिक्त असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आहे.

बॉक्स

बुधवारचे मृत्य

(कृपया तीन ओळी जागा सोडावी)

Web Title: Corona's four deaths, 344 reports positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.