पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:59+5:302021-02-24T04:13:59+5:30

पान ३ मोर्शी : तालुक्यातील पाळा येथे छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्यावतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवपूजन व कोरोनायोद्धा ...

Coronary warriors at the rear | पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा समावेश

पाळा येथे कोरोनायोद्ध्यांचा समावेश

पान ३

मोर्शी : तालुक्यातील पाळा येथे छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्यावतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवपूजन व कोरोनायोद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपत नेवारे, पोलीस पाटील सागर साठे, नरेंद्र जिचकार, प्रकाश घोरमाडे, विलास राऊत, बाळ मधापुरे, प्रशांत राणे, किरण काळे, नितीन राणे, श्रावण राऊत उपस्थित होते. याप्रसंगी गावातील कोरोनायोद्धा नरेंद्र जिचकार, डॉ. दीपाली नकसकार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक राऊत, संचालन अमोल निस्वादे व आभार प्रदर्शन विनीत उबाळे यांनी केले. अंकित ठवळी, प्रतीक राऊत, अभिजित मोहने, नितेश गोडबोले, करण मोहने, जयेश घोडकी, गजू गायकवाड, तिहले यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Coronary warriors at the rear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.