कोरोना योद्धांना दोन महिन्यापासृून वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:49+5:302021-01-23T04:12:49+5:30
अमरावती : कोरोना काळात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ...

कोरोना योद्धांना दोन महिन्यापासृून वेतन नाही
अमरावती : कोरोना काळात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गत दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. ही समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी २५ जानेवारी रोजी हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्षवेध आंदोलन केले जाणार आहे.
मुख्य कार्यपालन अधिकारी तुकाराम टेकाळे यांना दिलेल्या निवेदनानुसार, हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनने आराेग्य कर्मचाऱ्यांना महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन दिले जात नाही. शासननिणर्यानुसार, प्रत्येक महिन्यात १५ ते २५ तारखेनंतरच कोषागार देयके पाठविले जातात. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याची ओरड आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २०२० या दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांच्या विविध सात मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देवेंद्र शिंदे यांनी दिला आहे.