शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांवरील 13.5 लाख तरुणांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहेत. त्यानुसार हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कॉमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली. आता १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ वयोगटात ५,३२,९७० व ४० ते ४५ वयोगटात २,६६,४.८५ या व्यक्तींचे लसीकरण येत्या १ मेपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपूर्वीचे टार्गेट ४१ टक्के पूर्ण, लसीचा साठा तोकडा, अर्धेअधिक केंद्रे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत आता जिल्ह्यातील १८ वर्षांवरील १३ लाख ५ हजार ४६ युवकांचे १ मे पासून लसीकरण होणार आहे. यापूर्वीचे पहिल्या डोजचे ३३.८३ व दुसऱ्या डोजचे ७.८१ टक्के असे ४१ टक्के टार्गेट जिल्ह्यात पूर्ण झाले. ही टक्केवारी बरीच मोठी राहिली असती, मात्र लसींचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे अर्धेअधिक केंद्रे बंद राहण्याची वेळ ओढवलेली आहे.
जिल्ह्याला ५,८७,४८० टार्गेट असताना आतापर्यंत २,४२,६८४ व्यक्तींचे लसीकरण झाले. यात १,९८,७६८ व्यक्तींनी पहिला, तर ४५,९०६ व्यक्तींनी दुसरा डोज घेतले. आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. काही डोस वायादेखील गेले.
जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहेत. त्यानुसार हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कॉमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली. आता १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ वयोगटात ५,३२,९७० व ४० ते ४५ वयोगटात २,६६,४.८५ या व्यक्तींचे लसीकरण येत्या १ मेपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

लसींच्या साठ्याचा हवा नियमित पुरवठा 
 जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. जिल्ह्यातील १२५ केंद्राद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.
 तीन दिवसांपूर्वी मिळालेले २० हजार डोज सद्यस्थितीत संपल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद आहेत. गुरुवारी रात्रीपर्यत काही डोज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

लसीकरणात ज्येष्ठच समोर
जिल्ह्यात आतापर्यंत १,१६,४७१ ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. त्या तुलनेत अन्य तीन प्रकारात कमी लसीकरण झाले आहे. यामध्ये शहरी भाग आघाडीवर आहे. 

शहरी भागात वाढणार केंद्रे
शहरी भागात अधिक लाभार्थी असल्याने लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२५ केंद्रे आहेत. यात आणखी ५० केंद्राची भर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

४५ वयोगटात ७१,६७३ लसीकरण
 या वयोगटात ६८७८९ व्यक्तींनी पहिला डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड ५१,०३६ व कोव्हॅक्सिनचा १७,७५३ व्यक्तींनी डोज घेतला.
 या वयोगटात २,८८४ व्यक्तींनी दुसरा डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड २,२३९ व कोव्हॅक्सिनचा ६४५ व्यक्तींनी डोज घेतलेला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस