मांजरखेड कसबा येथे स्वातंत्र्यदिनी कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:17 IST2021-08-18T04:17:45+5:302021-08-18T04:17:45+5:30

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा येथे १५ ऑगस्टला माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात ...

Corona vaccination on Independence Day at Manjarkhed town | मांजरखेड कसबा येथे स्वातंत्र्यदिनी कोरोना लसीकरण

मांजरखेड कसबा येथे स्वातंत्र्यदिनी कोरोना लसीकरण

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा येथे १५ ऑगस्टला माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती सुरेश निमकर, नितीन गोंडाणे, अमोल होले, मांजरखेडचे सरपंच गुल्हाने, देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख व मातृभूमी संघाचे अध्यक्ष अशोक जयस्वाल व पवार यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम जय मातृभूमी संघाच्यावतीने व पाताळेश्वर देवस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी निकोसे व येथील वैद्यकीय अधिकारी उमप उपस्थित होते. यावेळी बासलापूर, मांजरखेड, चिरोडी. गौरखेडा येथील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. अशोक जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. वीरेंद्र जगताप यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा अशोक जयस्वाल व ग्रामपंचायत व देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Corona vaccination on Independence Day at Manjarkhed town