कोरोनाने घेतले सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST2021-02-21T04:25:50+5:302021-02-21T04:25:50+5:30

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ४६० झाली आहे. कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र ...

Corona took seven casualties | कोरोनाने घेतले सात बळी

कोरोनाने घेतले सात बळी

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ४६० झाली आहे. कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आनंद विहार येथील ३३ वर्षीय तरुण, अर्जुननगरातील ६६ वर्षीय पुरुष, छांगानीनगरातील ७९ वर्षीय पुरुष, अंबापेठ येथील ८४ वर्षीय पुरुष, दीपनगरातील ६८ वर्षीय महिला, डोंगरयावली येथील ८० वर्षीय पुरुष व पंचवटी चौकातील ५८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

बॉक्स

२० दिवसांत ४२ मृत्यू

कोरोना संसर्गासह इतरही आजार असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या २० दिवसांत एकूण ४२ रुग्णांचा बळी गेला.. यामध्ये ३० ते ३५ वर्षांतील काही पुरुषांचा समावेश असल्याने चिंतेत भर पडली आहे.

----------

पॉईंटर

दिनांक मृत्यू

१० फेब्रुवारी ०१

११ फेब्रुवारी ०१

१२ फेब्रुवारी ०३

१३ फेब्रुवारी ०१

१४ फेब्रुवारी ०३

१५ फेब्रुवारी ०४

१६ फेब्रुवारी ०३

१७ फेब्रुवारी ०६

१८ फेब्रुवारी ०४

१९ फेब्रुवारी ०१

२० फेब्रुवारी ०७

Web Title: Corona took seven casualties