जळगाव आर्वीत ग्रामस्थांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:08+5:302021-03-18T04:13:08+5:30
आता गावोगावी सरपंचांचा पुढाकार, उत्स्फूर्त प्रतिसाद धामणगाव रेल्वे : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, गावोगावच्या सरपंच, उपसरपंच चाचणी शिबिर घेत ...

जळगाव आर्वीत ग्रामस्थांची कोरोना चाचणी
आता गावोगावी सरपंचांचा पुढाकार, उत्स्फूर्त प्रतिसाद
धामणगाव रेल्वे : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, गावोगावच्या सरपंच, उपसरपंच चाचणी शिबिर घेत आहेत. ग्रामस्थांची भीती घालवण्यासाठी स्वत: चाचणी करून घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जळगाव आर्वी येथे नुकतीच चाचणी आटोपली.
धामणगाव तालुक्यात एकाच आठवड्यात शंभरावर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जळगाव आर्वी येथे सरपंच सत्यभामा पंडितराव कांबळे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची चाचणी करून घेतली. ग्रामस्थांनीही पुढे येत त्याला प्रतिसाद दिला. यामुळे एका दिवशी शंभरावर लोकांची चाचणी पार पडली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखेडे, स्नेहल कुंजेकर, बी.एम. सरदार, के.टी. निकम, ग्रामसेवक बिजवे, सविता क्षीरसागर, प्रभा भोसले,नीलिमा घंटेवार, विजया टोणपे, सुधीर बुरघाटे या कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला होता.
फोटो- सरपंच सत्यभामा कांबळे स्वतः कोरोना चाचणी करून घेताना.