उमेदवारांना कोरोना चाचणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:06+5:302020-12-26T04:11:06+5:30
दर्यापूर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी २३ ते ३१ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, ...

उमेदवारांना कोरोना चाचणी अनिवार्य
दर्यापूर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी २३ ते ३१ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी उमेदवार, प्रतिनिधींना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याकरिता तहसील कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, गुरूवारी ९ व शुक्रवारी ७९ कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी एकही कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याकरिता अधिकारी/ कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांना २५ ते २६ डिसेंबरदरम्यान दोन सत्रात प्रशिक्षण मौलाना आझाद नगर परिषद उर्दू हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मतदान पथकाची कोरोना तपासणी करण्याची सुविधा मौलाना आझाद उर्दू हायस्कूल येथे प्रशिक्षणाच्या दिवशी करण्यात आली आहे.
--------------