धामणगावात कोरोना सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST2021-02-26T04:17:45+5:302021-02-26T04:17:45+5:30

बाोरच्या पानावर मोहन राऊत धामणगाव रेल्वे : धामणगावात कोरोना सुसाट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रशासनातील समन्वयाअभावी ...

Corona Susat in Dhamangaon | धामणगावात कोरोना सुसाट

धामणगावात कोरोना सुसाट

बाोरच्या पानावर

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : धामणगावात कोरोना सुसाट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रशासनातील समन्वयाअभावी सुपर स्प्रेडरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह तालुक्यातील ६७० रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव व १८ जणांचा मृत्यू होऊनही शहराला कोरोनासारख्या महामारीचे महत्व कळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धामणगाव शहर हे अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. सर्वात पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात शहरात आढळला. त्यानंतर मे, जून, जुलै या महिन्यात ४३ रुग्ण आढळले. त्यानंतर दर महिन्याला कोरोनाच्या संख्येत वाढ होत गेली. लग्नसराईत होणारी गर्दी, ग्रामपंचायत निवडणूक, शाळा-महाविद्यालयांना झालेली सुरुवात त्यातच कोरोना आजाराची भीती मनात नसल्याने ही संख्या वाढली. अमरावती जिल्ह्यात रुग्णाच्या वाढीत धामणगाव तालुका चौथ्या क्रमांकावर आहे. दररोज या शहरात सहा ते सात रुग्ण आढळत आहे.

गर्दीला आवर घालणार कोण

धामणगाव ही बाजारपेठ मोठी असल्याने दररोज शेकडो ग्रामस्थ या शहरात येतात. मेनलाईन येथील एकाच दुकानात २० ते २५ पेक्षा अधिक ग्राहक दिसतात. यात काही दुकानदाराच्या तोंडाला मास्क नाही. फिजिकल डिस्टन्सिंग देखील नाही. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेचे भरारी पथक दिसले की तेवढ्या पुरती तोंडाला पट्टी दिसते नंतर दुकानदार व ग्राहक खुल्या चेहºयाने दिसतात. ‘नो मास्क नो सेवा’ ही दुकानावरची पाटी केवळ नावापुरती राहिली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

धामणगाव शहर व तालुक्यात दिवसागणिक रुग्णांची नोंद होत आहे. काही पॉझिटिव्ह रुग्ण कुटुंबाला या आजाराची लागण होऊ नये, म्हणून काळजी घेत आहे. तर काही रुग्ण आपल्याला कोरोनाचा कोणताही त्रास नाही , असे णानून शहरात फिरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वास्तविक पाहता संबंधित रुग्ण घरी आहेत की बाहेर फिरतात, तसेच संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याकरिता पथक कार्यान्वित करणे महत्त्वाचे आहे. मात्र या रुग्णाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे पाहायला मिळत आहे.

कोट

एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कातील लोकांची चाचणी होणे गरजेचे आहे. वाढती साखळी तोडण्यासाठी व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, हॉटेल संचालक, कर्मचारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या चाचण्या करून घेणे महत्वाचे आहे. या चाचण्या झाल्या तर सुपर स्पे्रडर रोखण्यासाठी मोठी मदत होईल.

डॉ महेश साबळे

अधीक्षक

ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे

कोट २

पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे लक्ष देण्यासाठी एक पथक निर्माण करण्यात येत आहे. तसेच कोरोना चाचणी करून घेण्यासाठी नगरपरिषद कर्मचाºयांसह इतर लोकांनाही आग्रही विनंती करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही प्रकिया राबविण्यात येणार आहे.

प्रशांत उरकुडे

मुख्याधिकारी, पालिका, धामणगाव रेल्वे

धामणगाव तालुका दृष्टीक्षेपात

आॅगस्ट-९३

सप्टेंबर- १५०

आॅक्टोंबर- १०१

नोव्हेंबर- ४४

डिसेंबर-८०

जानेवारी- ६२

फेब्रुवारी-९२ (आजपर्यंत)

Web Title: Corona Susat in Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.