शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना संरक्षणाची कवचकुंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 11:10 AM

Chandrapur News अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली.

ठळक मुद्देमिरगीग्रस्त १५ जणांना पहिली लस दीर्घकालीन देखभालीची गरज

इंदल चव्हाण/ नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली. सामाजिक भान जपत शंकरबाबा व स्थानिक प्रशासन मुलांच्या लसीकरणासाठी ‘फ्रंटफूट’वर आलेत. त्या दिव्यांगांना कोरोना लसीच्या रूपाने संरक्षक कवचकुंडले दिली. मात्र, त्या मुलांची शासनस्तराववर दखल घेतली जाईल का, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.

             वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात १२३ बेवारस दिव्यांग मुले मुली आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने ७ जून रोजी या बालगृहात येऊन तेथील मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. पैकी १३ अतितीव्र मिरगीग्रस्त मुलांना लस दिल्यानंतर काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून लस देण्यात आली नव्हती. दरम्यान, गुरुवारी आरोग्य विभागाच्या वाहनाने त्या १३ मुलांसह अन्य दोन अशा १५ मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी ११ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने व त्यांच्या चमूने या मुलांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला. यावेळी अपंग विभागाचे प्रमोद भक्ते, डॉ. प्रीती मोरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. देवघरे, डॉ. पवन दळणकर, आकाश चव्हाण, वझ्झर संस्थेचे मुख्याध्यापक अनिल पिहुलकर, विशेष शिक्षक नंदकिशोर आकोलकर, केअर टेकर सुभाष काळे, वार्डन वर्षा काळे, किरण केचे, उद्धव जुकरे, मंगेश गुजर, सुषमा मोहिते, युनिस ब्रदर उपस्थित होते. जवळपास सहा तास मुलांना निगराणीत ठेवण्यात आले. त्या मुलांना कुठलाही त्रास न झाल्यामुळे, नाश्ता व फुल देऊन त्यांना आश्रमात रवाना करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाढले जेवण

या १५ मुलांना लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची भेट घेऊन स्वत: जेवण वाढले. भेटवस्तू दिल्यात. त्यांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर उपस्थित राहिल्याचे समाधान शंकरबाबांनी लोकमतजवळ व्यक्त केले.

वझ्झर संस्थेत ७ जून रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले. मात्र, या १५ मुलामुलींना अतितीव्र मिरगीचा आजार असल्याने त्यांच्यावर संशोधन करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.

श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक

आश्रमात मिरगीचा आजार असलेल्या १० मुली व ५ मुले वास्तव्याला आहेत. २० वर्षांपासून त्यांचा सांभाळ मी करीत आहे. माझे वय ८० वर्षे झाले असून, शासनाने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांना गुरुवारी अमरावतीला लसीकरणासाठी पाठविले. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांची काळजी घेतल्याने बरे वाटले.

- शंकरबाबा पापळकर,

समाजसुधारक, वझ्झर

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस