जिल्ह्यात कोरोनाचा दिलासा, २०१ संक्रमित, पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST2021-06-09T04:15:26+5:302021-06-09T04:15:26+5:30

मृतांमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव येथील ६७ वर्षीय महिला, भातकुली तालुक्यातील विर्शी येथील ८० वर्षीय पुरुष, अमरावतीच्या संकेत कॉलनीतील ...

Corona relief in the district, 201 infected, five deaths | जिल्ह्यात कोरोनाचा दिलासा, २०१ संक्रमित, पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा दिलासा, २०१ संक्रमित, पाच जणांचा मृत्यू

मृतांमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव येथील ६७ वर्षीय महिला, भातकुली तालुक्यातील विर्शी येथील ८० वर्षीय पुरुष, अमरावतीच्या संकेत कॉलनीतील ८२ वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी येथील ७० वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जीच्या अंंबानगर येथील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पाच मृतांपैकी चार रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गत २४ तासात २०१ संक्रमित रुग्ण आढळून आले. ८५६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. ४०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात ४२५, तर ग्रामीण भागात १६९० रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत १५११ जणांचे बळी घेतले. ॲक्टिव्ह रुग्ण २९७१, रिकव्हरी रेट ९५.२६ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवस एवढा आहे. मृत्युदर १.६० टक्के आहे. आतापर्यंत एकूण ६ लाख २४ हजार ५१४ नमुने तपासणी करण्यात आली. संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या ग्रामीण भागातील असल्याने आराेग्य यंत्रणेचे भंबेरी उडाली आहे.

Web Title: Corona relief in the district, 201 infected, five deaths