1,589 गावांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:01:01+5:30

 जिल्ह्यात ४ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने संक्रमितांचे संख्येत वाढ होत आहे. याला अपवाद फक्त मागील दीड महिना ठरला आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत सात हजार रुग्णांची नोंद झाली व दीडशे नागरिकांना मृत्यू झाला. याशिवाय यंदा डेल्टा प्लस व्हेरिएंटने ओढावलेल्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत म्हणजेच मार्च ते जून २०२१ या कालावधीत ७० हजार कोरोनाग्रस्त १२०० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच जुलैपासून संक्रमणात कमी यायला लागली व आता सप्टेंबरपासून संसर्ग एकदम माघारला आहे.

Corona over 1,589 villages | 1,589 गावांची कोरोनावर मात

1,589 गावांची कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश दृष्टिपथात येते, याचा प्रत्यय जिल्हा ग्रामीणमध्ये दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी ५० हजारांंवर कोरोनाग्रस्तांची नोंद झालेल्या जिल्हा ग्रामीणमध्ये महिनाभरात फक्त दोन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यातील १५८९ गावे आता कोरोनामुक्त झालेली आहे. महापालिका क्षेत्रातही आतापर्यंतचे सर्वात कमी फक्त पाच सक्रिय रुग्णांची नोंद आहे.
 जिल्ह्यात ४ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने संक्रमितांचे संख्येत वाढ होत आहे. याला अपवाद फक्त मागील दीड महिना ठरला आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत सात हजार रुग्णांची नोंद झाली व दीडशे नागरिकांना मृत्यू झाला. याशिवाय यंदा डेल्टा प्लस व्हेरिएंटने ओढावलेल्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत म्हणजेच मार्च ते जून २०२१ या कालावधीत ७० हजार कोरोनाग्रस्त १२०० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच जुलैपासून संक्रमणात कमी यायला लागली व आता सप्टेंबरपासून संसर्ग एकदम माघारला आहे. त्यातल्या त्यात महिनाभरात जिल्हा ग्रामीणमध्ये फक्त दोन कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली नाही. 
केवळ अमरावती महापालिका क्षेत्रात एखाद-दुसऱ्या संंक्रमितांची नोंद होत असल्याचे दिसून येते. शहरातही आतापर्यंतची सर्वात कमी कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे.

सक्रिय रुग्णांचा नीचांक
जिल्ह्यात साडेचार हजार सक्रिय रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत नोंद करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत आता फक्त पाच रुग्ण सक्रिय आहेत. हा नीचांक असला तरी जिल्ह्यासाठी दिलासाजनक आहे. यामध्ये चार रुग्ण महापालिका क्षेत्रात तर, एक ग्रामीण भागातील आहे. सध्या तीन रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने कोरोना हॉस्पिटलमध्ये फक्त दोन रुग्णांवरच उपचार सुरू आहे.

तिसऱ्या लाटेची तयारी म्यान
सप्टेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे गृहीत धरून जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारा मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केलेली आहे. वाढीव बेड, ऑक्सिजन बेड, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांटसह रुग्णालय, जिल्हा मुख्यालयी लिक्विड ऑक्सिजन प्लांटची मागणी आदी तयारी प्रशासनाद्वारे करण्यात आली होती. संसर्ग माघारल्याने आता तयारी म्यान केल्याचे दिसून येते.

 

Web Title: Corona over 1,589 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app