३६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:58+5:302021-02-27T04:15:58+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, फ्रंटलाईन वर्कर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत ३६ ...

३६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, फ्रंटलाईन वर्कर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत ३६ एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून, यामध्ये चालक-वाहकांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यापैकी पाच ते सहा ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
लॉकडाऊनमध्ये सहा महिने बसफेऱ्या बंद होत्या. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्या सुरू झाल्या. दिवाळीत बसफेऱ्या वाढविण्यात आल्या. आता पुन्हा अमरावती शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहेत. त्यामुळे बसफेऱ्या जरी कमी करण्यात आल्या असल्या तरीही शेकडो फेऱ्या अद्यापही सुरूच आहे. चालकांपेक्षा वाहकाचा प्रवाशांची संपर्क जास्त येतो. यामुळे त्यांना कोरोनाचा धोका वाढला आहे.
कोट
आतापर्यंत ३६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. चालक-वाहकांना फ्रंटलाईनला राहून कर्तव्य बजावावे लागते. सर्वाधिक वाहकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले आहे.