दोघे भाऊ, सासू-सुनेने हरविले कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:05+5:30

हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत स्थापित कोविड-१९ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका व सुसज्ज यंत्रणेच्या निगराणीत १४ दिवस या चार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Corona lost two brothers, mother-in-law and daughter-in-law | दोघे भाऊ, सासू-सुनेने हरविले कोरोनाला

दोघे भाऊ, सासू-सुनेने हरविले कोरोनाला

ठळक मुद्देचौघे सुखरूप घरी रवाना : आरोग्य यंत्रणेच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

कोविड-१९ रूग्णालयाच्या चमूने टाळ्या वाजून दिला निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविड-१९ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. त्यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्ण घरी परतणे ही त्या रुग्णांलयासाठी गौरवाची बाब. म्हणून कोविड-१९ रुग्णालयातून बरे होऊन जाताना दोघे भाऊ, सासू-सुनेला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी टाळ्या वाजवून निरोप दिला, तर या चौघांनीही टाळ्या वाजवून प्रतिसाद देत रुग्णसेवेबाबत आभार व्यक्त केले.
हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत स्थापित कोविड-१९ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका व सुसज्ज यंत्रणेच्या निगराणीत १४ दिवस या चार रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी त्यांना सर्व डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाºयांनी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. पुढील काही दिवस कोरोनामुक्त झालले हे चौघे होम क्वारंटाईन राहणार आहेत.
उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व आरोग्य कर्मचाºयांना सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. नागरिकांनीही कोरोनाबाबत दक्षता बाळगावी. कुठलीही लक्षणे दिसताच तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड- १९ रुग्णालयात सेवा देणाºया पारिचारिकांनी केले.

माहिती लपवू नका; कोरोनाचे रुग्ण बरे होतात
रुग्णालयात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाºयांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कोणत्याही नागरिकाने कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या या रुग्णांची आहे.

डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा करीत आहेत. महापालिका हद्दीतील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जण बरे होऊन परतले, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बाब दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे.
- श्यामसुंदर निकम, शल्यचिकित्सक, इर्विन रूग्णालय.

Web Title: Corona lost two brothers, mother-in-law and daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.