कोरोनामुळे उन्हाळी शिबिरे यंदाही लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST2021-05-16T04:12:27+5:302021-05-16T04:12:27+5:30
अमरावती : वर्षभर अभ्यास करून वैतागलेल्या लहान मुलांना काही नवीन शिकण्याच्या दृष्टीने दीर्घ सुटीच्या दिवसांत एप्रिल, मे महिन्यात उन्हाळी ...

कोरोनामुळे उन्हाळी शिबिरे यंदाही लॉकडाऊन
अमरावती : वर्षभर अभ्यास करून वैतागलेल्या लहान मुलांना काही नवीन शिकण्याच्या दृष्टीने दीर्घ सुटीच्या दिवसांत एप्रिल, मे महिन्यात उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जातात. मात्र गतवर्षीपासून उन्हाळी शिबिरेही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असल्यामुळे लहान मुलांची करमणूकही लाॅकडाऊन झाल्याचे चित्र आहे.
एप्रिल-मे महिन्यात शाळांच्या परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना उन्हाळी शिबिराचे वेध लागत असतात. व्यक्तिमत्व विकास, प्रबोधन, व्यायाम शिबिर, संगीत क्लासेस, वाद्यांचे क्लासेस, छंद शिबिरे इत्यादी कला शिकविण्यासाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. परंतु गत मार्च- एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वारंवार होणाऱ्या लाकडाऊनमुळे उन्हाळी शिबिरदेखील लाॅकडाऊन झाली आहेत. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासालादेखील खीळ बसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे शाळा शिबिरे इत्यादी सारेच बंद आहे. त्यामुळे मुलांना घरीच रहा, सुरक्षित रहा या सल्ल्याचा आता कंटाळा येऊ लागला आहे. घरी बसून वारंवार मोबाईल आणि टीव्ही पाहून मुले देखील बोअर झाली आहेत. लाॅकडाऊमुळे क्रीडांगणावर,उद्यानावरदेखील जाण्यास बंदी असल्याने घरात रोज दिवस ढकलण्याची वेळ मुलांवर आली आहे. काही ठिकाणी ऑनलाइन व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेण्यात येतात. परंतु त्याकडे मुलांनी पाठ फिरविली आहे.तसेच उन्हाळी सुटीत आयोजित करण्यात येणारी शिबिरेदेखील हुकल्याची मुलांमध्ये खंत व्यक्त होत आहे.
बॉक्स
लॉकडाऊनमुळे मुलांचा आनंद हिरावला
पोहणे, गावाकडे जाऊन मजा करणे, उन्हाळी शिबिरात सहभागी होऊन जीवनाचा आनंद लुटण्याची मजा वेगळीच असते. मुले-मुली प्रत्येक वर्षी याची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु या सर्व गोष्टींना मुकावे लागल्याने कोरोना आणि लॉकडाऊनने मुलांचा आनंद हिरावल्याची खंतही पालकांमधूनही व्यक्त होत आहे.