लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘कोरोना लॅब’ सज्ज झाली आहे. बायोसेफ्टी कॅबिनेट व आर्टिफिसीआर या दोन्ही मशीनची चाचपणी झाली असून, एका तासात १२ थ्रोट स्वॅब तपासणीची क्षमता त्यांची आहे. आता कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी आयसीएमआर (इंडियन काउंसिल आॅफ मेडिकल रिसर्च) च्या मान्यतेची तेवढी प्रतीक्षा आहे.विद्यापीठाच्या फॅब्रिकेशन लेबॉरेटरीने आयसीएमआरला माहिती पाठविली आहे. सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्रयोगशाळेबाबतची माहिती दिली. ‘अॅस्ट्रॉक्शन सॅम्पल’ हे आॅटोमॅटिकली दर तासाला १२ तपासण्या करू शकतील. मशीन सज्ज झाल्या असून, त्याची आयसीएमआरकडे सचित्र माहिती पाठविण्यात आली आहे. फॅबलॅबमध्ये नमुने तपासणीची सुविधा आधीच आहे. वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालयाकडून येणाऱ्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल दिला जातो. मॉलिक्यूलर अॅनालिसीस, केमिकल तपासणीसुद्धा येथे होते.आयसीएमआर देणार आॅनलाइन मार्गदर्शनविद्यापीठात ‘कोरोना लॅब’मध्ये थ्रोट स्वॅब तपासणीच्या अनुषंगाने आयसीएमआर आॅनलाईन मार्गदर्शन देणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. लॅबमध्ये असलेल्या आवश्यक सुविधांची माहिती पाठविण्यात आली आहे. लॅबमध्ये विशेषज्ञांची चमू तपासणीसाठी सज्ज आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नमुन्यांचे अहवाल प्रलंबित राहण्याची समस्या दूर होण्याचे जवळपास निश्चित आहे.विद्यापीठात डीएनए सिक्वेंसरसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या फॅबलॅबमध्ये यापूर्वीच डीएनए सिक्वेंसर हे दीड कोटींच्या निधीतून उपलब्ध करण्यात आले. १८ लाखांचे सिक्वेंसर, आॅर्टिफिसीआर व केनोप्रोमॅटीग्राफी ही साधने ५० लाखांच्या निधीतून घेण्यात आली आहेत. वैद्यकीय क्षेत्र, केमिकल, दंत महाविद्यालयाशी निगडीत चाचण्या येथे करण्यात येतात.
‘कोरोना लॅब’ सज्ज; आयसीएमआर मान्यतेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST
विद्यापीठाच्या फॅब्रिकेशन लेबॉरेटरीने आयसीएमआरला माहिती पाठविली आहे. सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्रयोगशाळेबाबतची माहिती दिली. ‘अॅस्ट्रॉक्शन सॅम्पल’ हे आॅटोमॅटिकली दर तासाला १२ तपासण्या करू शकतील. मशीन सज्ज झाल्या असून, त्याची आयसीएमआरकडे सचित्र माहिती पाठविण्यात आली आहे.
‘कोरोना लॅब’ सज्ज; आयसीएमआर मान्यतेची प्रतीक्षा
ठळक मुद्देविद्यापीठात बायोसेफ्टी कॅबिनेट, आर्टिफिशिआरची चाचपणी : एका तासात १२ थ्रोट स्वॅब तपासणीची क्षमता