कोरोनामुळे अन्य जिल्ह्यांतील १६८ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST2021-05-24T04:12:21+5:302021-05-24T04:12:21+5:30
------------------------- एमआयडीसी परिसरात संशयिताला अटक अमरावती : रात्रीच्या वेळेत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एका तरुणाला राजापेठ पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील हनुमान ...

कोरोनामुळे अन्य जिल्ह्यांतील १६८ रुग्णांचा मृत्यू
-------------------------
एमआयडीसी परिसरात संशयिताला अटक
अमरावती : रात्रीच्या वेळेत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एका तरुणाला राजापेठ पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील हनुमान मंदिराजवळ अटक केली. रूपेश रामभाऊ भायदे (२९, रा. गांधीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक किसन मापारी यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी रूपेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------
१५ हजारांचे ॲल्युमिनियमचे साहित्य लंपास
अमरावती : शहरातील अंकुरनगरातून १५ हजार रुपयांचे ॲल्युमिनियमचे साहित्य चोराने लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मंगेश कृष्णराव जाधव (४७, रा. ज्योतीनगर) यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, त्यांनी बांधकामस्थळी काही साहित्य ठेवले होते. २२ मे रोजी ते नवीन घरातील बांधकाम पाहण्यासाठी गेले असता, त्यांना पंधरा हजाराचे साहित्य चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसात नोंदविली.
-----------------