शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

कोरोनाने १० जणांचा बळी, ६९९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:00 AM

जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यत अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ घोषित केले. कठोर निर्बंध लागू केेले. तरीही बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावे गर्दी कायम आहे. नियमावलींचे पालन होण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत असली तरी अमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे.

ठळक मुद्देमृत्युसंख्या ५२१, बाधितांचा आकडा पोहोचला ३५,८१६ वर, चिंतेत भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवीन वर्षात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच  मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाने दगावलेल्यांचा आकडा दुहेरी संख्येत आला. १० जणांचा बळी कोरोनाने घेतला असून, ६९९ संक्रमित आढळून आले. ‘लॉकडाऊन’मध्येसुद्धा कोरोनाग्रस्त व मृत्युसंख्या कमी होण्याचे चिन्हे दिसून येत नाही.जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यत अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ घोषित केले. कठोर निर्बंध लागू केेले. तरीही बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावे गर्दी कायम आहे. नियमावलींचे पालन होण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत असली तरी अमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. समूह संसर्गाचा धाेका बळावला असतानाही नागरिक बेफिकीर आहेत. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना पॉझिटिव्ह अधिक आढळून येत आहे. सोमवारी ६९९ कोरोना संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ३५ हजार ८१६ एवढी नोंद करण्यात आली आहे. १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्युसंख्या  ५३१ झाली आहे. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ३३४३, तर ग्रामीण भागात ९७६ रुग्ण उपचार घेत आहे. दाखल संक्रमित १४४५ एवढे,  तर ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७६४ आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट  ८२.४५ टक्के असून, डबलिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४५ टक्के आहे. एकूण नमुने २ लाख  २७ हजार ४६१ तपासणी करण्यात आले आहेत.

कोरोनाचे मृत्यू १० की १७?जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, कोरोनाने सोमवारी १० रुग्णांचा बळी घेतला. मात्र, येथील हिंंदू स्मशानभूमीत रात्री ८ पर्यंत कोरोनाचे बळी ठरलेल्या १७ मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती स्मशानभूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. त्यामुळे कोरोनाने नेमके किती रुग्ण दगावले, ही बाब संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. सरणावर कोरोनाग्रस्त नसलेल्या ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 २४ तासांत १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये मोतीनगर (अमरावती) येथील ३५ व अचलपूर येथील ५५ वर्षीय महिला तसेच निंभोरा येथील ६५, राधानगरातील ६५, गुरुदेवनगर (मोझरी) येथील ६०, मोर्शी येथील ७३, मोझरी येथील ७५, महेश भवन कोविड सेंटर येथे ८०, नेरपिंगळाई येथे ७५, नांदगाव खंडेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या