कोरोनाचे संक्रमण ९० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST2021-05-27T04:14:00+5:302021-05-27T04:14:00+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या फेब्रुवारी ते मे महिन्यात झपाट्याने वाढली आहे. बुधवारी ५२८ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने ही संख्या ...

कोरोनाचे संक्रमण ९० हजार पार
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या फेब्रुवारी ते मे महिन्यात झपाट्याने वाढली आहे. बुधवारी ५२८ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने ही संख्या आता ९०,०७५ वर पोहोचली आहे. याशिवाय नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,३९९ वर पोहोचली आहे.
चार महिन्यांपासून असलेल्या वाढत्या संसर्गात पहिल्यांदा १० टक्क्यांच्या आत पाॅझिटिव्हिटी आल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. बुधवारी ६,०८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात दिलासाजनक अशी ८.६७ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय उपचारानंतर बरे वाटल्याने बुधवारी उच्चांकी १,१७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ८१,६९७ वर पोहोचली आहे. मृत्यूदरात मात्र, अंशत: वाढ झालेली आहे. बुधवारी मृत्यूची टक्केवारी १.५५ नोंदविण्यात आलेली आहे.
बॉक्स
बुधवारी २४ तासांतील मृत्य
उपचारादरम्यान ६५ वर्षीय पुरुष, कोकर्डा, दर्यापूर, ५५ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, ७४ वर्षीय पुरुष, पिंपलोड, ४५ वर्षीय पुरुष, बेनोडा, २६ वर्षीय पुरुष, निंभा, ६२ वर्षीय पुरुष, अचलपूर, ७९ वर्षीय महिला, किशोर नगर, अमरावती, ६०, पुरुष, शिरजगाव बंड, ७५ वर्षीय पुरुष, शिरजगाव कसबा, या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.