परतवाड्यातील कोरोना संक्रमित वकिलाचा अमरावतीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:41+5:302021-04-02T04:13:41+5:30
अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीसह देवमाळी, कांडली, पथ्रोटसह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण निघतच आहे. यात काही रुग्णांचा मृत्यू झाला ...

परतवाड्यातील कोरोना संक्रमित वकिलाचा अमरावतीत मृत्यू
अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीसह देवमाळी, कांडली, पथ्रोटसह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण निघतच आहे. यात काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांत एकट्या पथ्रोटमधील चार कोरोना संक्रमितांचा नागपूर व अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडत असतानाही तालुक्यात सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. बाजारपेठेसह दैनिक बाजारात, आठवडी बाजारात सर्वत्र गर्दी बघायला मिळत आहे. कोरोनाची त्रिसूत्री पायदळी तुडविली जात आहे.
बॉक्स
कोरोना संक्रमितांची भ्रमंती
कोरोना संक्रमित काही रुग्णांचा सर्वत्र मुक्त संचार बघायला मिळत आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही आपल्याला कुठलीच लक्षणे नाहीत. या सबबीवर ते फिरत आहेत. रुग्णालयातून किंवा कोविड सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर होम क्वारंटाईन असतानाही काही लोक मोकळ्या मनाने बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. अनेकांच्या संपर्कात ते येत आहेत. याचा फटका नाहक सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता बळावली आहे.