कोरोनाने चार मृत्यू, १२६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST2021-06-11T04:10:01+5:302021-06-11T04:10:01+5:30

अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान गुरुवारी चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी १,५१६ झाली. याशिवाय नव्या १२६ पॉझिटिव्हची ...

Corona has four deaths, 126 positive | कोरोनाने चार मृत्यू, १२६ पॉझिटिव्ह

कोरोनाने चार मृत्यू, १२६ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान गुरुवारी चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी १,५१६ झाली. याशिवाय नव्या १२६ पॉझिटिव्हची नोंद झाली. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्त ९४,७५० झाले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी ६,२९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन टक्केचा पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. याशिवाय गुरुवारी ठणठणीत झालेल्या ७४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९०,६९८ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी ९५.७२ आहे.

बॉक्स

शहरात मृत्यू निरंक, ग्रामीणमध्ये चार

जिल्ह्यात २४ तासांत ४० वर्षीय महिला (दर्यापूर), ७० वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुष (मोर्शी), ६८ वर्षीय महिला (रामपूर, ता. अचलपूर) या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. या आठवड्यात दोन दिवस महापालिका क्षेत्रात मृत्यू झालेला नाही.

Web Title: Corona has four deaths, 126 positive