कोरोनाने आठ मृत्यू, २९४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:46+5:302021-06-06T04:09:46+5:30

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान आठ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृत्युसंख्या १,४९५ झाली आहे. याशिवाय २९४ नव्या ...

Corona has eight deaths, 294 positive | कोरोनाने आठ मृत्यू, २९४ पॉझिटिव्ह

कोरोनाने आठ मृत्यू, २९४ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान आठ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृत्युसंख्या १,४९५ झाली आहे. याशिवाय २९४ नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९३ हजार ७८२ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आता घटला आहे. शनिवारी ६,३९० नमुन्यांमधून ४.६० टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. याशिवाय दिवसभरात ५२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या आता ८८ हजार ७०१ झालेली आहे. ही टक्केवारी ९४.५८ आहे.

बॉक्स

२४ तासांतील कोरोना मृत्यू

उपचारादरम्यान अमरावती शहरातील ७० वर्षीय पुरुष (गोपालनगर), ६७ वर्षीय पुरुष (गणेश कॉलनी), ७८ वर्षीय महिला (जवाहरनगर) तसेच ५५ वर्षीय महिला (मोर्शी), ५२ वर्षीय पुरुष (पुसला, ता. वरूड), ८० वर्षीय पुरुष (चांगापूर), ४६ वर्षीय पुरुष (लोणी, ता. वरूड), ५० वर्षीय पुरुष (कांडली) या रुग्णांचा मृत्यू झाला.

Web Title: Corona has eight deaths, 294 positive