कोरोनाने २१ मृत्यू, ७९८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:38+5:302021-05-19T04:13:38+5:30
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १२९० झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील एका ...

कोरोनाने २१ मृत्यू, ७९८ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १२९० झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मंगळवारी ७९८ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ८४,५९८ झाली आहे.
कोरोना संसर्ग वाढण्याच्या अलीकडच्या काळात २५ एप्रिल रोजी ६८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४,३९२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६.१६ टक्के पाॅझिटिव्हिटी नोंद झाली आहे, तर २४ तासांपूर्वी २३.८५ टक्के पाॅझिटिव्हिटी नोंद करण्यात आली होती. अलीकडे चाचण्यांची संख्याही घटली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, मंगळवारी १,०१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ७३,१५ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी ८६.४७ एवढी आहे.
बॉक्स
२४ तासांतील कोरोनामृत्यू
(कृपया पाच ओळी जागा सोडावी)