कोरोना; पाच मृत्यू, ३९८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:29+5:302021-04-11T04:13:29+5:30
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकंदर कोरोनाबळी ७०५ झाले आहेत. याशिवाय दिवसभरात ३९८ जणांचे अहवाल ...

कोरोना; पाच मृत्यू, ३९८ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकंदर कोरोनाबळी ७०५ झाले आहेत. याशिवाय दिवसभरात ३९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ५१,९२३ झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलदरा येथील ७१ वर्षीय पुरुष, वरूड येथील ३५ वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे येथील ६१ वर्षीय पुरुष, बडनेरा येथील ५८ वर्षीय पुरुष व सुशील नगर (अमरावती) येथील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी ३,४८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३९८ पॉझिटिव्हची नोंद झाली. ही पॅाझिटिव्हिटी ११.४२ टक्के आहे. या चार दिवसांत पुन्हा पॉझिटिव्हिटी वाढीस लागल्याने चाचण्यांची संख्यावाढ करणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दाखल केंद्रीय आरोग्य पथकाने महापालिका क्षेत्रासह जिल्हा ग्रामीणमधील काही ‘हॉट स्पॉट’चा आढावा घेतला, यामध्ये त्यांनी काही त्रुटी आढळल्याने याविषयीच्या सूचना आरोग्य विभागाला केल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
जिल्ह्यात ३,१४५ सक्रिय रुग्ण
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्ह्यात ३,१४५ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १,०१३ विविध रुग्णालयांत दाखल आहेत, तर उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय २३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४८,०७३ झाली आहे. ही टक्केवारी ९२.५९ आहे.