चिंचोली येथे कोरोनाचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST2021-05-15T04:12:43+5:302021-05-15T04:12:43+5:30

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. ...

Corona explosion at Chincholi | चिंचोली येथे कोरोनाचा स्फोट

चिंचोली येथे कोरोनाचा स्फोट

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १०० पैकी २२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी चिंचोली बु. या एकाच गावातील २० रुग्ण आहेत.

तालुका आरोग्य विभागामार्फत तालुक्यात तीन शिबिो घेण्यात आली. त्यापैकी चिंचोली येथील प्राथमिक केंद्रात रॅपिड ॲन्टिजेन चाचणीकरिता चांगलीच गर्दी झाली होती. बरेच नागरिक किट संपल्यामुळे परत गेले. दरम्यान, चिंचोली येथील २० जण कोरोनाबाधित आढळल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चिंचोली येथे दोन बँक शाखांसह पोलीस ठाणेदेखील आहे. येथे पंचक्रोशीतील नागरिकांची ये-जा अधिक प्रमाणात असल्याने चिंता वाढली आहे.

Web Title: Corona explosion at Chincholi