कोरोनामुळे ५४३१ बाळांना अत्यावश्यक डोज दिले गेले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:53+5:302021-02-23T04:19:53+5:30

बॉक्स शहरात ५, तर ग्रामीणमध्ये ३ दिवस उपक्रम शून्य ते ५ वर्षांच्या मुला-मुलींना अपंगत्व येऊ नये यासाठी शासनाद्वारा लसीकरण ...

Corona did not give the required dose to 5431 babies | कोरोनामुळे ५४३१ बाळांना अत्यावश्यक डोज दिले गेले नाहीत

कोरोनामुळे ५४३१ बाळांना अत्यावश्यक डोज दिले गेले नाहीत

बॉक्स

शहरात ५, तर ग्रामीणमध्ये ३ दिवस उपक्रम

शून्य ते ५ वर्षांच्या मुला-मुलींना अपंगत्व येऊ नये यासाठी शासनाद्वारा लसीकरण मोहीम दरवर्षी राबविली जाते. शहरी भागात पाच दिवस, तर ग्रामीण भागात तीन दिवस हा उपक्रम राबविला जातो. यात ३१ जानेवारी रोजी बुथवर शहरी भागात २८ हजार ९५६ बाळांना, तर ग्रामीण भागात १ लाख २७ हजार १६ बाळांना आणि घरोघरी जाऊन डोज देण्यात आला. यासाठी २२९९ ग्रामीण भागात व ११३ आरोग्य कर्मचारी व ७४ सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली होती.

जन्मदर

सन २०१८ मध्ये जन्मदर१३.३४ टक्के, तर सन २०१९ मध्ये १२.९३ टक्के जन्मदर होता.

कोट

यंदा लक्ष्यपूर्तीच्या ९७ टक्के पोलिओ लसीकरण यशस्वी झाले. ग्रामीण व शहरी भागात बुथवर तसेच घरोघरी फिरून आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. यात काहींपर्यंत कोरोनामुळे पोहचणे शक्य झाले नाहीत.

- दिलीप रणमले, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

पोलिओ डोजचा कालावधी डब्ल्यू एचओनी नियोजित केल्यानुसार ते बाळाला देणे अनिवार्य आहे. ते वेळेत न घेतल्यास समाजात इम्युनिटी वाढेल व बाळाचा समाजाशी असमतोल होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांनी कोरोनामुळे डोज घेतले नसतील त्यांना सोयीनुसार डोज देणे उचित राहील.

- अद्वैत पानट,

बाळरोगतज्ज्ञ, अमरावती

Web Title: Corona did not give the required dose to 5431 babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.