शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

कोरोनाने मरण स्वस्त; अपघातांमध्ये झाली घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपाच महिन्यांत ३८ जणांना गमवावे लागले प्राण

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवरअमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च ते ३१ मे दरम्यान लॉकडऊनमुळे रस्ते अपघातात मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. गत पाच महिन्यांत  १५१ अपघात झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. विनापरवाना तीन वाहन पडून असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाले. अवजड वाहने चालविणाऱ्या कष्टकरी वर्गाकडे लॉकडाऊन काळात कामे नसल्याने पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनाही वाहनांची दुरुस्ती करता आली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे काही अपघात महामार्गावर घडले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघात घडल्याची नोंद आहे. गत पाच महिन्यांत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५१ वाहन अपघात झाले. त्यात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांना जीव गमावावा लागला. मात्र, गतवर्षीच्या पाच महिन्याच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे यंदा अपघातात घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पायी चालणाऱ्यांनाही धोका रस्त्याने पायी जाणाऱ्यांचेही अपघात झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी शेतातून काम आटोपून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला मागून वाहनचालकांनी धडक दिल्याच्या घटना समोर आल्या. पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यांवरून चालवावे लागते. त्यामुळेसुद्धा धोका निर्माण झालेला आहे.  

लॉकडाऊनमध्ये अपघात घटलेलॉकडाऊनमध्ये अपघाती मृत्यूच्या संख्येत कमालीची घट झाली. गतवर्षीच्या अनेक गंभीर अपघातात काहींना प्राणाला मुकावे लागले. सन २०२१ मध्ये पाच महिन्यात अमरावती शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १५१ अपघातात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश शहरात झालेल्या अनेक अपघातांमध्ये तरुणांना जीव गमावावा लागला. भरधाव  वेगाने वाहन चालविणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकी पळविणे, स्वत:च अपघात करून मरणास कारणीभूत ठरणे आदी अनेक प्रकरणांमध्ये सर्वाधिक तरुण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. 

या ठिकाणी वाहने हळू चालवाशहरात सर्वत्र सिमेंटचे गुळगुळीत रस्ते तयार झाले, मात्र रनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत त्या ठिकाणी वाहने हळू चालवावी दारू पिऊन वाहने चालवून नये, आपला व आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीव धोक्यात टाकू नये. 

नागरिकांनी वाहतुकीचे नियंम पाळावे. शहरातून भरधाव वेगाने वाहन चालविणे टाळावे. शहरात वर्षभर कारवाया सुरूच असतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, सर्वांनी वाहतूक नियम पाळले तर अपघात टळू शकते. - प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू