कोरोना ५० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:50+5:302021-04-06T04:12:50+5:30

वर्षपूर्तीच्या दुसऱ्याच दिवशी अनोखी नोंद, आतापर्यंत आढळले ५० हजार ६७ रुग्ण अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल ...

Corona crossed 50 thousand | कोरोना ५० हजार पार

कोरोना ५० हजार पार

वर्षपूर्तीच्या दुसऱ्याच दिवशी अनोखी नोंद, आतापर्यंत आढळले ५० हजार ६७ रुग्ण

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० मध्ये आढळला होता. रविवार, ४ एप्रिल रोजी कोरोनाची वर्षपूर्ती होत नाही, तोच ५ एप्रिल रोजी कोरोनाने ५० हजार संक्रमितांचा आकडा ओलांडला. आतापर्यंत ५० हजार ६७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे झाली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर असताना, कोरोनाने ५० हजारांचा टप्पा ओलांडल्याने आरोग्य यंत्रणेचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सरकारी, खासगी दवाखाने सज्ज करण्यात आले आहेत. यात डेडिकेडट कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटल, कोविड केअर आराेग्य केंद्र, तर डेडिकेडट कोविड हॉस्पिटल असे एकूण ४५ दवाखाने उपलब्ध केले आहेत. खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण करण्यात आले तसेच कोरोना रुग्णांना वेळीच बेड उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, वर्षभरात ३ लाख ३४ हजार १४५ नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर ५० हजार ६७ रुग्ण आढळून येणे ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. नवीन वर्षात फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांत कोरोनाग्रस्त सर्वाधिक संख्येने आढळून आले आहेत.

---------------------

वर्षभरात काेरोनाचा आलेख

एप्रिल २०२० - ४० नमुने १०२१

मे - १७८ १९०२

जून - ३४६ ४४९७

जुलैे - १५९३ १४५४६

ऑगस्ट - ३४६३ २२९६८

सप्टेंबर - ७७१३ ३३१८८

ऑक्टोबर - २९६९ २०५६९

नोव्हेंबर - १५८४ २४९९२

डिसेंबर - १७८२ २७६७७

जानेवारी (२०२१) - २२१९ २७४२१

फेब्रुवारी - १३२३० ४६४६८

मार्च - १३५१८ ९६४०८

५ एप्रिल - १४३२ १२४८८

------------ -----------------

एकूण : ५००६७ ३३४१४५

--------------------

आतापर्यंत कोरोनाचे बळी : ६८७

पुरुष : ५०४

स्त्री : १८३

------------------

कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमावलींचे पालन व्हावे, यासाठी महापालिका, पोलीस यंत्रणेमार्फत विनामास्क, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तरीही जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला, ही बाब चिंतनीय आहे.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Corona crossed 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.