कोरोना; ३० दिवसात ३४३५ चा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:01 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:01:07+5:30

जिल्ह्यात आरटी-पीसीआर, रॅपीड अ‍ॅन्टीेन व ट्रुनेट मशीनद्वारा नमुन्यांची तपासणी होत आहे. यापूर्वी फक्त आरटी-पीसीआरद्वारे नमुन्यांची तपासणी केली जायची. मात्र महिनाभरापूर्वी रॅपीट अ‍ॅन्टीजेन किटद्वारेही तपासणी केली जात असल्याने संक्रमितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे रुग्ण त्वरेने निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार केले जात असल्याने संकेमनमुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झालेली आहे.

Corona; Cross the 3435 mark in 30 days | कोरोना; ३० दिवसात ३४३५ चा आकडा पार

कोरोना; ३० दिवसात ३४३५ चा आकडा पार

ठळक मुद्देमे पासून ५५९२ पॉझिटिव्ह : चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्यावाढ झाल्याने संक्रमित रुग्णांचे प्रमाण अलीकडच्या दोन आठवड्यात वाढले आहे. ऑगस्ट महिन्याच्या ३० दिवसांत ३४३५ पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आरटी-पीसीआर, रॅपीड अ‍ॅन्टीेन व ट्रुनेट मशीनद्वारा नमुन्यांची तपासणी होत आहे. यापूर्वी फक्त आरटी-पीसीआरद्वारे नमुन्यांची तपासणी केली जायची. मात्र महिनाभरापूर्वी रॅपीट अ‍ॅन्टीजेन किटद्वारेही तपासणी केली जात असल्याने संक्रमितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे रुग्ण त्वरेने निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार केले जात असल्याने संकेमनमुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झालेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्राप्त माहितीनुसार १ ऑगस्टला कोरोना संक्रमितांची संख्या २१५७ होती, ५ ऑगस्टला २५९८, १० ऑगस्टला ३०६८, १५ ऑगस्टला ३५५८, २० ऑगस्टला ४१८९, २५ ऑगस्टला ४६८७ व ३० ऑगस्टला संक्रमित रुग्णांची संख्या ५५९२ वर पोहोचली आहे.
शहरातील प्रत्येक भागात तपासण्यांमध्ये सातत्य ठेवण्यात आलेले आहे. संशयित आढळताच त्याला दाखल करून घेणे, वेळीच उपचार व संपकार्तील इतर व्यक्तींच्या तपासण्या ही कार्यवाही विहित वेळेत होत आहेत. शहर व ग्रामीण भागातील हाय रिस्क क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढविण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संशयित रूग्णांचा शोध घेण्यासाठी पथकांकडून नियमितपणे तपासणी मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यात सारी या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. या रुग्णांमधून अनेकजण कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झालेले आहे. रोज ५ ते ७ सारीचे रुग्णांची नोंद असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

४४,८४७ नागरिकांचे स्वॅब
जिल्ह्यात मे पासून ३० ऑगस्टपर्यंत ५,५९२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. ३८,१४६ अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. अद्याप ८७० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये ट्रुनेट मशीनमध्ये पॉझिटिव्ह अशी नोंद झालेले ७५ नमुने पुन्हा आरटी-पीसीआर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. कोविड रुग्णालयात (डीसीएच) ६१५, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (डीसीएचसी) ४१५, डेडीकेटेड कोविड केअर सेंटरला (डीसीसीसी) २,३०३ असे एकूण ३,४२३ बेडची उपलब्धी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

८५५ कटेनमेंट झोन
जिल्ह्यात २७ ऑगस्टपर्यत ८५५ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आशा व एएनएमच्या एकूण ६४१ चमू कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी ७५६ रुग्ण नव्याने निष्पन्न झालेले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कातील ९,२७९ नागरिकांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आयडीएसपीद्वारा सारी (अ‍ॅक्यूट रेस्पीरेटरी ईलनेस) व इली (ईन्फूएंझा लाईक ईलनेस) सर्व्हेक्षण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Corona; Cross the 3435 mark in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.