कोरोना; समितीचा 'वॉच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:22+5:30

शहरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाणे नागरिक, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी समन्वय साधून कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात पाच झोनस्तरावर व प्रत्येक प्रभागात मोहल्ला समिती गठित केली जाईल. या समितीचा आठवड्यातून एकदा महापौर व आयुक्त आढावा घेणार आहेत.

Corona; Committee's 'Watch' | कोरोना; समितीचा 'वॉच'

कोरोना; समितीचा 'वॉच'

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्र : झोन, प्रभाग समिती, आठवड्यातून एकदा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकाक्षेत्रात कोरोनाचा वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. यानुसार प्रत्येक मोहल्ला व झोनमध्ये समिती गठित करून उपाययोजनांवर 'वॉच' व आवश्यक तेथे सहकार्य केले जाणार आहे. यासाठीच्या सूचना आयुक्त प्रशांत रोडे यांनी शनिवारी संबंधितांना दिल्या आहेत.
शहरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाणे नागरिक, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी समन्वय साधून कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात पाच झोनस्तरावर व प्रत्येक प्रभागात मोहल्ला समिती गठित केली जाईल. या समितीचा आठवड्यातून एकदा महापौर व आयुक्त आढावा घेणार आहेत. झोन समितीत सभापती हे अध्यक्ष व सहायक आयुक्त सदस्य सचिव राहतील. प्रभागातील सर्व नगरसेवक, उपअभियंता, महसूल विभागाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी हे सदस्य राहतील.
प्रभाग, मोहल्ला समितीमध्ये नगरसेवक हे समन्वयक राहतील, सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील किमान ३० सदस्य स्वास्थ्य निरीक्षक व प्रभाग अभियंता राहणार आहेत. मोहल्ला समितीत प्रत्येक नगरसेवकांद्वारे त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणार आहेत.

बाहेरगावाहून कुणी आल्यास चौकशी
मोहल्ला समितीद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या घरी बाहेरगावाहून कोणी व्यक्ती आल्यास त्याची चौकश्ी केली जाईल व आवश्यकता वाटल्यास त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. घरातील वृद्ध व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनविकार यासंबंधी औषधी नियमित घेणे व आवश्यक वाटल्यास औषधोपचार पोहचविणे, मोहल्ल्यात कंटेनमेंट झोन असल्यास तेथील व्यक्ती घरातच राहतील याची काळजी तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

कंटेनमेंटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
सदर प्रभागात कंटेनमेंट झोन जाहीर असल्यास तेथे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल याकडे लक्ष देणे, संशयित कोविड-१९ रुग्णाला स्वॅब देण्यासाठी सेंटरवर पोहचविण्यास मदत करणे, आशा, एएनएम यांना मदत करणे, प्रभागात वाढदिवस, लग्न, पार्टी, समारंभ आदी होत असल्यास त्यांना मदत करणे, परिसरातील फेरीवाले, दूधवाले व इतर विक्रेते नियमांचे पालन करीत नसल्यास पोलीस व स्वास्थ्य निरीक्षकांकडे तक्रार करणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणेशी संपर्क करणे हे समितीचे लक्ष्य राहील.

Web Title: Corona; Committee's 'Watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.