प्रबोधिनीत कोरोना ब्लास्ट, १७ प्रशिक्षणार्थी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:01 IST2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:01:05+5:30

विभागातील नव्याने नियुक्त तलाठ्यांचे नोव्हेंबरपासून प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान शनिवारी १७ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ महिला व नऊ पुरुष कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  आता दोन महिन्यांपासून तलाठ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आयुक्तांचा पोलीस गार्ड व अन्य एक कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

Corona Blast in Prabodhini, 17 trainees positive | प्रबोधिनीत कोरोना ब्लास्ट, १७ प्रशिक्षणार्थी पॉझिटिव्ह

प्रबोधिनीत कोरोना ब्लास्ट, १७ प्रशिक्षणार्थी पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनीत शनिवारी कोरोनाचा ब्लास्ट झाला. यामध्ये तब्बल १७ कर्मचारी एकाच वेळी पॉझिटिव्ह आल्याने शिबिर गुंडाळल्याची माहिती आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी तलाठी प्रवर्गातील आहेत.
विभागातील नव्याने नियुक्त तलाठ्यांचे नोव्हेंबरपासून प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान शनिवारी १७ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ महिला व नऊ पुरुष कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  आता दोन महिन्यांपासून तलाठ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आयुक्तांचा पोलीस गार्ड व अन्य एक कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

शनिवारी ४० डिस्चार्ज
जिल्ह्यात शनिवारी १५११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८८ जण पाॅझिटव्ह आलेले आहेत. यात ५.८२ टक्के पॅझिटिव्हिटी आहे. महापालिका क्षेत्रात ७३, तर ग्रामीणमध्ये १५ संक्रमितांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये नऊ तालुक्यात झालेली कोरोनाग्रस्तांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात सध्या ३०५ सक्रिय रुग्ण आहेत. उपचारानंतर बरे वाटल्याने शनिवारी ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९६,५६७ कोरोनाग्रस्त, तर ९४६६२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहे.
 
Web Title: Corona Blast in Prabodhini, 17 trainees positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.