कोरोना ब्लास्ट : १९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:14+5:30

शहरातल्या विविध भागातील हायरिस्कच्या १८२ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. आता अहवाल येत असल्याने शहरातील संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यापैकी बहुतेक संक्रमित व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्याने संस्थात्मक विलणीकरणातील आहेत. विशेष म्हणजे, एका आठवड्यात म्हणजेच १४ मेपासून आतापर्यंत ४५ संक्रमित रुग्ण आढळूण आले आहेत.

Corona Blast: 19 Positive | कोरोना ब्लास्ट : १९ पॉझिटिव्ह

कोरोना ब्लास्ट : १९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देमसानगंज : पाच संक्रमित एकाच कुटुंबातील‘त्या’ जमादाराची पत्नीदेखील पॉझिटिव्हडॉक्टरची पत्नीदेखील संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील नव्या भागात कोरोनाचा जोरदार शिरकाव झालेला आहे. बुधवारी दुपारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहराला हादरा बसला. यामध्ये कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनलेल्या मसानगंज भागात दिवसभरात सात अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरिक्त तीन नव्या भागात संक्रमितांची नोंद झाल्याने शहरात समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे.
शहरातल्या विविध भागातील हायरिस्कच्या १८२ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. आता अहवाल येत असल्याने शहरातील संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यापैकी बहुतेक संक्रमित व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्याने संस्थात्मक विलणीकरणातील आहेत. विशेष म्हणजे, एका आठवड्यात म्हणजेच १४ मेपासून आतापर्यंत ४५ संक्रमित रुग्ण आढळूण आले आहेत.
विद्यापीठ प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार, मसानगंजमध्ये सात व्यक्ती बुधवारी संक्रमित आढळून आले. यामध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. पाटीपुऱ्यातील एक १० वर्षाची मुलगी व २५ वर्षाची महिला बाधिताच्याच परिवारातील आहे. शिवनगरात २२ वर्षीय तरुण व ४४ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. पॅराडाईज कॉलनीमध्ये एक ४९ वर्षीय महिला, याव्यतिरिक्त चेतनदास बगीचा येथे १३ वर्षीय मुलगी, प्रबृद्धनगर येथे १७ वर्षीय तरुणी, पार्वतीनगरात ३२ वर्षीय पुरुष, सिंधुनगरात ४५ वर्षीय महिला, रहमतनगरात ६५ वर्षीय पुरुष, नांदगावपेठ येथील ४७ वर्षीय महिला, बेलपुºयातील ३४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये प्रबुद्धनगर, पार्वतीनगर व शिवनगर या नव्या भागात प्रथमच कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने हा परिसर कंटेनमेंट घोषित करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाद्वारा सुरु आहे. दरम्यान, बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग आवागमनासाठी बंद करण्यात येऊन या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आलेली आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची हिस्ट्री घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच त्यांचे परिवारातील हाय रिस्कच्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. विद्यापीठ लॅबमध्ये बुधवारी ११० नमुन्यांची तपासणी झाली.

मसानगंज : पाच संक्रमित एकाच कुटुंबातील
कोरोनाचा नवा हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज कंटेनमेंटमध्ये तीन दिवसांपूर्वी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याचे संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यापैकी संक्रमित युवकाचे आई, वडील, काका, आजी व वहिनी यांचे स्वॅब अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले आहेत. अन्य दोन व्यक्तीदेखील बाधिताच्या संपर्कातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या भागात मोठ्या प्रमाणात गिले वडे बनविले जातात. त्यावर आता टांच येईल.

‘त्या’ जमादाराची पत्नीदेखील पॉझिटिव्ह
गाडगेनगर ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी नागपूरला उपचार घेत आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल नागपूरला पॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे मुलाचाही अहवाल नागपूरला पॉझिटिव्ह आला. येथील पॅराडाइज कॉलनीत वास्तव्य असनाºया त्यांच्या पत्नीचा अहवाल बुधवारी अमरावतीला पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त कोविड रुग्णालयातील एक बेलपुºयातील कर्मचारी यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच परिवारातील आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे.

डॉक्टरची पत्नीदेखील संक्रमित
सिंधुनगरातील एक ५५ वर्षीय खासगी वैद्यकीय व्यावसायिकाचा अहवाल १६ मे रोजी पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांचा दवाखाना वडाळी येथे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या ४९ वर्षीय पत्नीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. याच संपर्कात प्रबुद्धनगरातील एक महिला नर्स आहे. त्यांच्या भाचीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला आहे. पार्वतीनगरातील युवकाची चायनिज खाद्याची हातगाडी गाडगेनगर येथे आहे. हा युवकही संक्रमित झाला आहे. पाटीपुरा येथील दोन महिला पॉझिटिव्ह यापूर्वीच्या बाधिताचे संपर्कातील आहेत.

नवे चार कंटेनमेंट झोन घोषित
नव्याने रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी चार नवे कंटेनमेंट झोन जाहीर केले. यामध्ये बेलपुरा (स्वीपर कॉलनी परिसर), बजंरग टेकडी (मसानगंज परिसर), शिवनगर ( जय सियाराम परिसर व प्रबुद्धनगर (वडाळी परिसर) या भागांचा समावेश आहे. या प्रतिबंधित भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागातून बाहेर जाण्यास व बाहेरच्या नागरिकांना या क्षेत्रात अत्यावश्यक कारणाशिवाय मनाई करण्यात आलेली आहे.
 

Web Title: Corona Blast: 19 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.