दर चार मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:08+5:302021-03-21T04:13:08+5:30

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५१ सेंकदात एक कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली ...

Corona bite one every four minutes | दर चार मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

दर चार मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५१ सेंकदात एक कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. याशिवाय दर ८ तास ३३ मिनिटांत एका कोरोनाग्रस्ताचा बळी गेल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. या उद्रेकात ४० टक्क्यांवर गेलेली चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी आता आठ टक्क्यांवर आल्याचा दिलासादेखील आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २४,८९० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७८ दिवसांत दरदिवशी ३१९ पॉझिटिव्ह निष्पन्न झालेले आहे. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५१ सेंकदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३४९ दिवसांत ४४,५५८ नागरिकांना कोरोनाचा डंख झालेला आहे. म्हणजेच एका दिवसांत १२७ कोरोनाग्रस्ताची नोंद या काळात झालेली आहे. दर ११.२७ मिनिटांनी एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आहे व याच कालावधीत ६२१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दरदिवशी दोन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. दर १२ तासांत एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारा कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. वाढत्या बेडची संख्या. प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटर सोबत नमुने घेण्याचे केंद्रदेखील सुरू करण्यात आलेले आहे. याशिवाय पथकांद्वारा सातत्याने दंडात्मक कारवायादेखील सुरू आहे. याचाच परिपाक म्हणून या चार दिवसांत कोरोना संसर्गाला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासाजनक बाब आहे.

बॉक्स

दर मिनिटाला एका कोरोनाग्रस्ताला डिस्चार्ज

जिल्ह्यात १९ मार्चपर्यंत ३९,५७३ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. हा रिकव्हरी रेट ८६.०० टक्के आहे. जानेवारी महिन्यापासून १९ मार्चपर्यंत २०,६७८ व्यक्ती संक्रमणमुक्त झालेले आहेत. म्हणजेच दिवसाला २३८ नागरिक कोरोनामुक्त झालेले आहे. दरमिनिटाला सहा नागरिक कोरोनामुक्त होत असल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

या आठवड्यात कोरोना संसर्गाला ओहोटी

जिल्ह्यात जानेेवारी २०२१ पासून कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा स्फोट झाला. या महिन्यात जवळपास १५ हजार रुग्णांची नोंद झाली. ९५० पर्यंत उच्चांकी कोरोनाग्रस्तांची नोंददेखील याच कालावधीत झालेली आहे. आता ४०० ते ४०० दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत व चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील ८ टक्क्यांपर्यंत आली असल्याने कोरोना संसर्ग आता माघारल्याचे चित्र आहे.

बॉक्स

नन्या स्ट्रेनविषयी चर्चा, दुजोरा नाही

कोरोनाचे जनुकीय रचनेत बदल झालेला असून जिल्ह्यात कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ आला व याद्वारे संक्रमणात वाढ झाल्याचे आयएमएचे पदाधिकारी सांगत आहे. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासन बोलावयास तयार नाही. जिल्ह्यातून चार प्रकारातील १०० नमुने जिनोम स्टडीकरता पुणे एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. याविषयी आयसीएमआरचा अहवाल अप्राप्त असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

आतापर्यंत दिवसाला सरासरी १२७ पॉझिटिव्हची नोंद

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे ४ एप्रिलपासून आतापर्यंत ४४,५५८ रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजेच एका दिवसात १२७ व ११ मिनिटे २७ सेंकदाला एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत ६२१ कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजेच दरदिवशी दोन व दर १२ तासांत एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पाईंटर

* १ जानेवारीची स्थिती

एकूण कोरोनाग्रस्त : १९,६६८

संक्रमितांचे मृत्यू : ३९६

संक्रमणमुक्त व्यक्ती :१८,८९५

* १९ मार्च रोजीची जिल्हास्थिती

एकूण कोरोनाग्रस्त : ४४,५५८

संक्रमितांचे मृत्यू : ६२१

संक्रमनमुक्त व्यक्ती :३९,५७३

Web Title: Corona bite one every four minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.