कोरोनाचे पुन्हा तीन बळी, ४७३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:36+5:302021-03-17T04:14:36+5:30

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ ...

Corona again three victims, 473 positive | कोरोनाचे पुन्हा तीन बळी, ४७३ पॉझिटिव्ह

कोरोनाचे पुन्हा तीन बळी, ४७३ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४७३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३,३५१ झालेली आहे.

या आठवड्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीमध्ये कमी आलेली आहे. मंगळवारी ३,५७८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १३.२७ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. चाचण्यांमध्ये चार दिवसांत घट आलेली असताना मंगळवारी चाचण्या जास्त झाल्यामुळे ४७५ रुग्णांची नोंद झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ लॅबमध्ये आता नवीन मशीन कार्यान्वित करण्यात आल्यामुळे लॅबची क्षमतावाढ झालेली आहे. चाचण्यांची संख्यावाढ झाल्याने झालेली रुग्णसंख्या वाढ काही दिवस येईल; मात्र, त्यानंतर निश्चितपणे रुग्णसंख्येत घट येणार असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, उपचारानंतर बरे वाटल्याने मंगळवारी ६२८ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ३८,३९६ जणांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ८८.५१ आहे तर जिल्ह्याचा मृत्युदर हा १.४० टक्क्यांवर आलेला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने मृत्युदरात कमी आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

मंगळवारी आतापर्यंतच्या उच्चांकी चाचण्या

जिल्ह्यात मंगळवारी करण्यात आलेल्या ३,५७८ कोरोना चाचण्या आतापर्यंतच्या उच्चांकी असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत २,६३,७६७ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १,१६,६४४ चाचण्या रॅपिड ॲन्टिजेनच्या आहेत. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये १६.४३ पॉझिटिव्हिटी आहे. हे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. मागच्या महिन्यामध्ये पॉझिटिव्हिचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.

बॉक्स

मंगळवारचे कोरोना मृत्यू

००००००००

००००००००००० कृपया जागा सोडावी, माहिती यायची आहे.

Web Title: Corona again three victims, 473 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.