कोरोना; पुन्हा २५ मृत्यू अन् उच्चांकी १,१२४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:56+5:302021-05-05T04:21:56+5:30

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संर्सगाला मंगळवारी एक वर्ष अन् एक महिना पूर्ण झालेला असताना ग्रामीण भागात उद्रेक झालेला आहे. ...

Corona; Again 25 deaths and a high of 1,124 positive | कोरोना; पुन्हा २५ मृत्यू अन् उच्चांकी १,१२४ पाॅझिटिव्ह

कोरोना; पुन्हा २५ मृत्यू अन् उच्चांकी १,१२४ पाॅझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संर्सगाला मंगळवारी एक वर्ष अन् एक महिना पूर्ण झालेला असताना ग्रामीण भागात उद्रेक झालेला आहे. मंगळवारी तब्बल २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील २३ व अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात संक्रमितांच्या मृत्यूची संख्या आता १,१६४ वर पोहोचली आहे. याशिवाय मंगळवारी १,१२४ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६९,५२५ झालेली आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती व हा रुग्ण ‘होमडेथ’ होता त्यानंतर सातत्याने मृत्यूची संख्या वाढती. या दरम्यान कोरोना संसर्गाच्या दोन लाटा आल्यात. सप्टेंबर २०२० मध्ये ७,११३ पॉझिटिव्ह व १५४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ मृत्यू, मार्चमध्ये १३, ५१८ पॉझिटिव्ह व १६४ मृत्यू झाले. हा संसर्ग आता एप्रिल महिन्यात वाढताच राहिला आहे. या महिन्यात १६,६८९ पॉझिटिव्ह व तब्बल ४१० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मे महिन्यात तर प्रमाण वाढतेच आहे.

जिल्ह्यात चाचण्यांदरम्यान पॉझिटिव्हिटी वाढतीच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मंगळवारी ४,०२३ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये १,१२३ अहवाल पॉझिटिव्ह आहे व यामध्ये २७.९१ पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. दोन आठवड्यात कोरोनाचा संसर्ग महापालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागात जास्त वाढला असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

बॉक्स

मंगळवारी २४ तासांतील मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी ६० वर्षीय महिला, शेंदूरजना बाजार, तिवसा, ९५ वर्षीय पुरुष, शिरजगाव कसबा, चांदूर बाजार, ४७ वर्षीय महिला, बेनोडा, वरुड, ५७ वर्षीय महिला, देवरा, ५० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ७२ वर्षीय पुरुष, काकडा, अचलपूर, ६८ वर्षीय पुरुष, नांदगाव पेठ, ६५ वर्षीय महिला, वाठोडा शुक्लेश्वर, ५५ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे, ४३ वर्षीय महिला, बोपापूर, ३६ वर्षीय पुरुष, वडगाव माहुरे, ४२ वर्षीय पुरुष, वरुड, ७९ वर्षीय पुरुष, अष्टविनायक कॉलनी, अमरावती, ४९ वर्षीय पुरुष, अमरावती, ७० वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे, ६२ वर्षीय पुरुष, सिंधी कॅम्प, बडनेरा, ४२ वर्षीय महिला, अमरावती, ५६ वर्षीय महिला, लोणी, ६० वर्षीय महिला, पथ्रोट, अचलपूर, ५५ वर्षीय महिला, चांदूर बाजार, ५८ वर्षीय महिला, धोतरखेडा, अचलपूर, ५५ वर्षीय पुरुष, गोपाल नगर, अमरावती व ५६ वर्षीय पुरुष कापूस तळणी, भातकुली याशिवाय अन्य जिल्ह्यातील ७९ वर्षीय पुरुष, नरखेड, नागपूर व ७२ वर्षीय पुरुष, आर्वी, वर्धा या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

Web Title: Corona; Again 25 deaths and a high of 1,124 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.